​माझी कुठलीही भूमिका राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही, असे का बोलला शाहरूख?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 12:01 IST2016-12-22T12:01:23+5:302016-12-22T12:01:23+5:30

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याने मोठ्या संघर्षाअंती सिनेसृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत शाहरूखने अनेक पुरस्कार ...

I am not eligible for any national award, says Shah Rukh. | ​माझी कुठलीही भूमिका राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही, असे का बोलला शाहरूख?

​माझी कुठलीही भूमिका राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही, असे का बोलला शाहरूख?

लिवूडचा किंगखान शाहरूख खान याने मोठ्या संघर्षाअंती सिनेसृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत शाहरूखने अनेक पुरस्कार पटकावले. पण काल-परवा एका कार्यक्रमात शाहरूख जे बोलला त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. होय, माझी कुठलीही भूमिका राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही, असे तो म्हणाला. अर्थात त्याच्या या बोलण्यामागे एक खंत दडलेली होती, हे सांगणे नकोच.
‘चक दे’ आणि ‘स्वदेश’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरसरकार  मिळाला नाही, याची तुला खंत वाटते का? असा प्रश्न शाहरूखला या कार्यक्रमात विचारण्यात आला. या प्रश्नावर शाहरूखने अनपेक्षित उत्तर दिले. पे्रक्षक, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या प्रेमामुळे आणि दिलदारपणामुळे माझ्या वाट्याला अनेक पुरस्कार आलेत. पण एखादा पुरस्कार माझ्या वाट्याला आला नसेल तर त्याचा अर्थ मी त्या पुरस्कारास पात्र नाही, असाच निघतो. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असता वा मिळायला हवा होता,अशी कुठलीही भूमिका मी आत्तापर्यंत केलीय, असे मला वाटत नाही. खरे तर मी पुरस्कार मिळावा म्हणून अभिनय करत नाही. एखादा पुरस्कार माझ्या वाट्याला आलेला नसेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे. मी त्यास पात्र नसेल, असे शाहरूख म्हणाला.

खरे तर यापूर्वी एकदा राष्ट्रीय पुरस्काराबद्दल शाहरूखने एक गमतीदार वक्तव्य केले होते. जोपर्यंत मला राष्ट्रीय पुरस्कार मिळत नाही, तोपर्यं मी रिटायर होणार नाही, असे तो गमतीत म्हणाला होता.

शाहरूखचा ‘रईस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा गुजरातमधील गँगस्टर अब्दूल लतीफ यांच्यावर आयुष्यावर आधारित असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र असे काहीही नसून ‘रईस’ हा पूर्णत: काल्पनिक सिनेमा असल्याचे अलीकडेच शाहरूखने स्पष्ट केले होते.

Web Title: I am not eligible for any national award, says Shah Rukh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.