कोण आहे हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड? इंडस्ट्रीतील 'या' व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:35 PM2024-06-25T16:35:50+5:302024-06-25T16:36:28+5:30

सोनाक्षी आणि हुमा या दोघी बेस्ट फ्रेंड आहेत.

Huma Qureshi spotted twinning with her rumoured boyfriend Rachit Singh at Sonakshi Sinha and Zaheer Iqbal wedding | कोण आहे हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड? इंडस्ट्रीतील 'या' व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री

कोण आहे हुमा कुरेशीचा बॉयफ्रेंड? इंडस्ट्रीतील 'या' व्यक्तीला डेट करतेय अभिनेत्री

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचं रविवारी २३ जून रोजी लग्न झालं. 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. आपल्या खास मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री हुमा कुरेशी उत्साही दिसून आली. सोनाक्षी आणि हुमा या दोघी बेस्ट फ्रेंड आहेत.  आता सोनाक्षीनंतर हुमा कधी लग्न करणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यातच हुमा कुरेशी ही कुणाला डेट करतेय याचा खुलासा झाला आहे. 

सोनाक्षीच्या लग्नात हुमा ही आपल्या बॉयफ्रेंडसोबत सहभागी झाली होती. हुमा आणि तिच्या बॉयफ्रेंडचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हुमा ही रचित सिंगला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. सोनाक्षीच्या लग्नात दोघांनी ट्विनिंग केल्याचंही दिसून आलं. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर रचितसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. 

रचित सिंग हा मुंबईतील प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक आणि अभिनेता आहेत. रचित सिंगने अनेक सेलिब्रिटींसोबत ट्रेनर म्हणून काम केलं आहे. या यादीत आलिया भट्ट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा आणि सैफ अली खान या नावांचा समावेश आहे. याशिवाय रचित शेवटचा रवीना टंडन आणि वरुण सूद यांच्या 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिजमध्ये दिसला होता.

काही वर्षांपूर्वी हुमा हिचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक मुद्दसर अजीज यांच्याशीही जोडलं गेलं होतं. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. मात्र, काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झाले. सध्या हुमा आणि रचित हे डेट करत असून दोघं अनेकदा एकत्र दिसतात. दोघांनी अद्यापही आपलं नातं खुलेपणाने सर्वांसमोर आणलं नाही. हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नेहमीच तिच्या स्टाईल अन् लूकसाठी ओळखली जाते. अलिकडेच हुमाच्या पॉलिटिकल थ्रिलर 'महाराणी' वेबसीरिजचा तिसरा सीझिन प्रेक्षकांच्या भेटीला आला. 
 

Web Title: Huma Qureshi spotted twinning with her rumoured boyfriend Rachit Singh at Sonakshi Sinha and Zaheer Iqbal wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.