कियारानंतर बॉलिवूडच्या 'महाराणी'ची यशच्या 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री, किलर लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:16 IST2025-12-28T15:15:59+5:302025-12-28T15:16:54+5:30
कियारा आडवाणीनंतर आता आणखी एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीचा 'टॉक्सिक' चित्रपटातील पहिला लुक समोर आला आहे.

कियारानंतर बॉलिवूडच्या 'महाराणी'ची यशच्या 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री, किलर लूक आला समोर
Huma Qureshi IN Yash Toxic Movie : सुपरस्टार यशचा आगामी चित्रपट 'टॉक्सिक' सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. २०२६ मधील सर्वात बहुप्रतिक्षित असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपुर्वीच 'टॉक्सिक'मधून अभिनेत्री कियारा अडवाणीचा फर्स्ट लूक आऊट झाला होता. आता कियारानंतर या चित्रपटातील दुसऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीचा लूक समोर आला आहे. तिचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी हुमा कुरेशी आहे. आज २८ डिसेंबर रोजी निर्मात्यांनी हुमा कुरेशीचा 'टॉक्सिक'मधील पहिला लूक शेअर केला. या पोस्टमध्ये हुमा 'एलिझाबेथ' या भूमिकेत दिसत आहे. एका विंटेज काळ्या कारसमोर काळ्या रंगाच्या गडद पेहरावात उभ्या असलेल्या हुमाचा हा लूक अत्यंत रहस्यमयी आणि 'किलर' वाटतोय. 'महाराणी' आणि 'दिल्ली क्राईम' सारख्या सीरिजमधून आपली छाप पाडल्यानंतर आता हुमा यशच्या 'टॉक्सिक'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Introducing Huma Qureshi @humasqureshi as ELIZABETH in - A Toxic Fairy Tale For Grown-Ups #TOXIC#TOXICTheMovie@advani_kiara#GeetuMohandas@RaviBasrur#RajeevRavi#UjwalKulkarni#TPAbid#MohanBKere#SandeepSadashiva#PrashantDileepHardikar#KunalSharma#SandeepSharma… pic.twitter.com/aozI7wKWCb
— Yash (@TheNameIsYash) December 28, 2025
'टॉक्सिक'मध्ये सुरुवातीला करीना कपूर खानची एन्ट्री झाल्याची चर्चा होती. मात्र आता कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी या दोन बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच या चित्रपटात नयनतारा आणि तारा सुतारियादेखील झळकणार असल्याची चर्चा आहे. पण, अद्याप त्याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
'टॉक्सिक' vs 'धुरंधर २'
यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच तारखेला बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण, दिग्दर्शक आदित्य धरचा मल्टीस्टारर चित्रपट 'धुरंधर २'देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.