हृतिक व सुजैनने एकत्र साजरी केली होळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 16:58 IST2017-03-13T11:28:12+5:302017-03-13T16:58:12+5:30

हृतिक रोशन याने आजची होळी मुलांसोबत आणि त्याच्या एक्स-वाईफ सुजैन खान हिच्यासोबत साजरी केली. हृतिक व सुजैन यांचा घटस्फोट ...

Hritik and Suzanne celebrate Holi! | हृतिक व सुजैनने एकत्र साजरी केली होळी!

हृतिक व सुजैनने एकत्र साजरी केली होळी!

तिक रोशन याने आजची होळी मुलांसोबत आणि त्याच्या एक्स-वाईफ सुजैन खान हिच्यासोबत साजरी केली. हृतिक व सुजैन यांचा घटस्फोट झालाय. पण रेहान आणि हृीदान या आपल्या मुलांसाठी दोघेही एकत्र येतात. मग मुलांसोबत होळी साजरी करायला हवीच. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून हृतिक व सुजैन एकत्र आले आणि दोघांनीही मुलांसोबत होळी साजरी केली.




गेल्या काही दिवसांपासून हृतिक व सुजैन यांच्यातील दुरावा कमी होत असल्याचे दिसते आहे. गेल्या काही महिन्यांत दोघेही अनेकदा एकत्र दिसले. काही दिवसांपूर्वी  रेहान आणि हृीदानसह या आपल्या मुलांसह हृतिक आणि सुजैन लंडनच्या रस्त्यांवर फिरतांना दिसले होते. यानंतर डिसेंबर महिन्यात दुबईत मुलांसह व्हेकेशन एंन्जॉय करतानाही हे दोघे दिसले. यापश्चात हृतिक रोशन आणि यामी गौतमी यांचा ‘काबिल’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला सुजैन हजर होती. हा सिनेमा पाहिल्यानंतर लगेचच तिने ट्वीट करत 'काबिल' सिनेमाच्या यशासाठी दिग्दर्शक संजय गुप्ताला शुभेच्छा दिल्या. इतकेच  नाही तर पुढे हृतिक रोशनच्या अभिनय हा मनाला स्पर्शून जातो,असे म्हटले होते. हृतिकच्या वाढदिवसाच्या पार्टीतही सुजैन हजर होती. 

हृतिक आणि मी पालक सर्वात आधी आहोत. पालक या नात्याने येणाºया जबाबदा-या पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सुजैनने आधीच स्पष्ट केले आहे़ कदाचित याच जबाबदारीपोटी अलीकडे सुजैन व हृतिक वारंवार एकत्र येऊ लागले आहेत़ पण असे असले तरी  हृतिक व सुजैन दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसू लागले आहे. तुमच्या-आमच्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली बरे असू शकेल? 

Web Title: Hritik and Suzanne celebrate Holi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.