हृतिकला जिंकायचीयं कंगनाविरूद्धची बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 19:40 IST2016-03-16T16:29:27+5:302016-05-17T19:40:06+5:30
हृतिकला जिंकायचीयं कंगनाविरूद्धची बाजी? हृतिक आणि कंगना या दोघांमधील कायदेशीर वाद सांमजस्याने मिटणार, अशा काही बातम्या मंध्यतरी आल्या असताना ...
.jpg)
हृतिकला जिंकायचीयं कंगनाविरूद्धची बाजी?
हृतिक आणि कंगना या दोघांमधील कायदेशीर वाद सांमजस्याने मिटणार, अशा काही बातम्या मंध्यतरी आल्या असताना आता एक नवे अपडेट आले आहे. हृतिकला कंगनाविरूद्धची बाजी ऐनकेन प्रकारे जिंकायचीच आहे, असे एकंदरीत दिसतेयं. कारण, या प्रकरणासंदर्भात हृतिकने नामवंत विधिज्ञ महेश जेठमलानी यांना कायदेशीर सल्ला मागितल्याची बातमी आहे. आत्तापर्यंत दीपेश मेहता यांनी या प्रकरणात हृतिकचा वकील म्हणून बाजू मांडलेली आहे. महेश जेठमलानी हे टॉप मोस्ट क्रिमिनल लॉयर म्हणून सुपरिचित आहेत. यापूर्वी महेश जेठमलानी यांनी टाडा प्रकरणात अभिनेता संजय दत्त याची बाजू मांडली होती. आता कंगना विरूद्ध हृतिक या प्रकरणाचा महेश जेठमलानी काय सोक्षमोक्ष लावतात, ते बघायचेयं...!!
.....................................
कंगनाने हृतिकला पाठवलेले मॅसेज लीक
हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यातील वादात आज नवाच खुलासा झाला. कंगनाने कथितरित्या हृतिकला पाठवलेले काही ईमेल लीक झाले असून यानिमित्ताने कंगनाच्या मनात हृतिकबद्दल असलेले प्रेमही उजागर झाले आहे. पुरावे म्हणून हृतिकने हे ईमेल सायबर क्राईम सेलकडे सूपुर्द केले होते. हृतिकचे वकील दीपेश मेहता यांनी गत काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या क्राईम डिव्हिजनला ४० अॅडिशनल ईमेल पुराव्यादाखल सूपुर्द केले होते. यातील अनेक ईमेलमध्ये कंगनाने हृतिकबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका ईमेलमध्ये कंगनाने लिहिलेयं की, अचानक एखाद्या दिवशी मी तुला ओळखत नाही, असे म्हणालास तर मी या धक्क्यातून कशी सावरेल? कंगनाने हृतिकला असे अनेक ईमेल पाठवले होते, खाली बघा कंगनाचे असेच काही ईमेल...
- का ईमेलमध्ये कंगनाने कथितरित्या हृतिक व तिच्या नात्याबद्दल असुरक्षित वाटत असल्याचे लिहिले आहे. कधी कधी मला प्रत्येक बाबतीत असुरक्षित वाटते. खरचं आपल्या दोघांमध्ये प्रेम आहे की ही निव्वळ फँटसी आहे? आपले प्रेम खरे आहे की मी एखाद्या कल्पनेतल्या माणसाशी बोलतेय?
- एका ईमेलमध्ये कंगनाने ती एका मानसिक आजाराशी झुंजत असल्याचे लिहिले आहे. मला Asperger's Syndrome असल्याचे मला कळले आहे. मी याबद्दल प्रचंड टेन्शनमध्ये आहे. वेळ मिळाल्यास याबद्दल वाचशील. मलाया आजाराने ९८ टक्के ग्रासले आहे.
- एका ईमेलमध्ये ती लिहिते, लहानपणी मी मनालीच्या एका पेपरमध्ये तुझा फोटो पाहिला होता. तो पाहून मी स्वत:ला रोखू शकले नव्हते. हा केवळ माज्यासाठीच आहे, असे मी त्यावेळी स्वत:शी पुटपुटले होते.
-अन्य एका ईमेलमध्ये कंगनाने लिहिलेयं की, ज्यादिवशी मी तुला भेटेल, त्यादिवशी काय होईल? कदाचित मी त्यादिवशी भोवळं येऊनच पडेल.
......................................
हृतिकच्या वकीलाच्या कंगनाला कानपिचक्या
हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यातील ‘लव्ह हेट वॉर’ थांबायचे नाव नाही. नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, १५ दिवस उलटूनही कंगनाने याप्रकरणासंदर्भात सायबर सेलसमोर आले बयान नोंदवलेले नाही. हृतिकच्या वकीलांनी यानिमित्ताने कंगनाला कानपिचक्या घेतल्या आहेत. मीडियासमोर मोठ मोठे स्टेटमेंट देण्यापेक्षा सायबर क्राईम सेलसमक्ष एक आॅफिशिअल स्टेटमेंट नोंदवले तर तपासाला मदतच होईल, असे हृतिकच्या वकीलाने कंगनाचे नाव घेता म्हटले. केवळ एवढेच नाही तर, समोरचा पक्ष मीडियासमोर बयानबाजी करण्यासच जास्त उत्सूक असल्याचे दिसते. समोरच्या पक्षाने आपले बयान न नोंदवल्याने या प्रकरणाचा अख्खा तपास रखडला आहे, असा टोलाही हृतिकच्या वकीलांनी हाणला.
............................................................................
कंगनाच्या वकीलाचे पोलिस आयुक्तांना पत्र!!
कंगना रानोट आणि हृतिक रोशन यांचा कायदेशीर वाद काही दिवसांपासून गाजत आहे. दोघांनीही परस्परांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर हे प्रकरण आणखीच चिघळले होते. मध्यंतरी कंगना व हृतिक हे प्रकरण लवकरात लवकर मिटवू इच्छितात, अशी बातमी आली होती. आज मात्र यासंदर्भात आणखीच नवी बातमी येऊन धडकली. नव्या बातमीनुसार, कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी डीसीपीला पत्र लिहिले असून याप्रकरणातील विविध बाबींचा तपास करण्याची गळ घातली आहे. हृतिक रोशनने डिसेंबर २०१४ मध्ये पोलिसांत तक्रार दिली होती. आपल्या नावाने एका व्यक्तिने बोगस ईमेल अकाऊंट उघडले असून आपले अनेक चाहते व बॉलिवूड जगतातील अनेकांकडून या तोतयाबद्दल माहिती मिळाली असल्याचा दावा हृतिकने यात केला होता. असे असेल तर आत्तापर्यंत या प्रकरणात कुणाचीही चौकशी का झाली नाही? असा सवाल सिद्दीकींनी या पत्रात उपस्थित केला आहे. याचा अर्थ एकच निघतो, की अनेकांकडून तोतयाबाबत माहिती मिळाल्याचा हृतिकाचा दावा खोटा आहे किंवा पोलिसांनी याप्रकरणी गंभीरपणे तपास केलेला नाही,असेही कंगनाच्या वकीलाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान यासंदर्भात हृतिकच्या वकीलांशी संपर्क केला असता, खरे काय नि खोटे काय, याचा निर्णय पोलिस व न्यायालय घेईल, असे उत्तर त्यांनी दिला. कायद्याचे पालन करणारा नागरिक या नात्याने कंगनाने याप्रकरणातील चौकशीस सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
..........................................................
हृतिक कंगनासोबत समझौत्याच्या मूडमध्ये??
कंगना व हृतिक यांच्या कायदेशीर भांडणात रोज नव्या आरोप-प्रत्यारोपाची भर पडत आहे. आज हृतिकने वेगळेच बयान देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. माझ्या निशाण्यावर कंगना नाही तर दुसरीच व्यक्ति आहे, असे हृतिक म्हणाला. ही दुसरी व्यक्ति म्हणजे, जी हृतिकच्या नावाने कंगना व अन्य लोकांची फसवणूक करते आहे. ईमेल हॅक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याच्या आपल्या निर्णयाने कंगना हर्ट झाली, ही बाब हृतिकला आताश: अस्वस्थ करतेयं. हृतिकच्या या विधानाचा एक खास अर्थ काढला जात आहे. तो म्हणजे, कंगनासोबतचा समझौता. हृतिकचे तेवर थोडे मवाळ झाले आहेत. यावरून कंगनासोबतची कायदेशीर लढाई पुढे रेटण्यात आता हृतिकलाही फारसा इंटरेस्ट उरलेला नाही, असा निष्कर्ष निघतो.
हृतिकच्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ई मेल आयडी हॅक झाल्यामुळे हृतिक पुरता डिस्टर्ब आहे. कारण कुणीतरी दुसराच या ईमेल आयडीवरून कंगनासोबत हृतिक बनून बोलत होता. आता या प्रकरणात आपलेच चुकले, असे हृतिकला वाटू लागले आहे. त्याला स्वत:ला गिल्टी वाटू लागले आहे.
..............................................
‘लव्ह हेट वॉर’ला नवे वळण; हृतिकच्या FIR मध्ये कंगनाचे नाव
हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्या ‘लव्ह हेट वॉर’ला नवे वळण लाभले आहे. हृतिकने फेक मेल आयडी अर्थात बनावट ईमेल अकाऊंटविरोधात एफआयआर दाखल केला आहे. विशेष म्हणजे हृतिकच्या या तक्रारीत कंगनाचे नाव आहे. कंगनाही बनावट ईमेल अकाऊंटच्या संपर्कात होती आणि या मेल आयडीवर तिने अनेक मेलही केलेत, असा आरोप हृतिकने केला आहे.
डिसेंबर २०१४ मध्येही हृतिकने फेक मेल अकाऊंटसंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. माझ्या नावाने एक व्यक्ति माझ्या चाहत्यांशी बोलत असल्याचे हृतिकने या तक्रारीत म्हटले होते. मात्र या तक्रारीत कंगनाचे नाव नव्हते. आज दाखल केलेल्या नव्या तक्रारीत हृतिकने कंगनाचेही नाव समाविष्ट केले आहे. दरम्यान सायबर क्राईम विभागाने कंगनाला नोटीस बजावली असून सात दिवसांच्या आत जबाव नोंदविण्यास सांगितले आहे.
रंगोलीला सुद्धा नोटीस
सायबर क्राईत पोलिसांनी कंगनाची बहीण रंगोली हिलासुद्धा नोटीस बजावली आहे. रंगोलीस कंगना आणि कथित बनावट ईमेल बनवणारी व्यक्ति यांच्यातील ईमेल्सची माहिती होती, असा दावा करण्यात आला आहे. रंगोलीला सुद्ध सात दिवसांच्या आत जबाव नोंदवण्यास सांगितले आहे. कंगना-बनावट मेलर यांच्या हजारो मेलची देवाणघेवाण झाली असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
असे आहे प्रकरण
हृतिकच्या एफआयआरनुसार, एक व्यक्तिने त्याच्यानावाने बनावट ईमेल अकाऊंट ओपन केले. माझ्या नावाने उघडण्यात आलेले हे ईमेल अकाऊंट मी वापरत नाही, असा हृतिकचा दावा आहे. २४ मे २०१४ रोजी करणच्या बर्थ डे पार्टीत या बनावट ईमेल आयडीचा उलगडा झाल्याचे हृतिकने म्हटले आहे. त्याने तक्रारीत म्हटले आहे की, या बर्थ डे पार्टीत कंगना मला भेटली होती.‘क्वीन’सिनेमातील तिच्या कामाची मी प्रशंसा केल्यामुळे तिने माझे ईमेलवरून आभार मानल्याचे तिने सांगितले. पण मी हा सिनेमा पाहिलाच नव्हता. शिवाय कंगनाशी कधीही ईमेलवरून बोललो नव्हतो. माझा पर्सनल ईमेल आयडी hroshan@inac.com आहे. कंगना hroshan@email.com च्या संपर्कात होती. दरम्यान हृतिक आपल्याशी ईमेलवरून बोलत होता, असे कंगनाने म्हटले होते. यानंतर हृतिकने तिला कायदेशीर नोटीस पाठवले होते. कंगनाने सुद्धा उत्तर देत हृतिकला नोटीस पाठवली होती.
..............................................................................
-आणि कंगना बोलली
‘रंगून’ या चित्रपटाचे आऊटडोअर शुटींग संपवून कंगना रानोट नुकतीच मुंबईत परतली. मुंबईत एका इव्हेंटला कंगना आली आणि पत्रकारांनी तिला घेरले. साहजिकच हृतिक रोशन याच्यासोबतच्या कायदेशीर लढाईबाबतच्या प्रश्नांची पत्रकारांनी तिच्यावर सरबत्ती केली. अफेअरसंदर्भातील एका वक्तव्यावरून हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यात वाद पेटला आणि एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवण्यापर्यंत हा वाद शिगेला गेला. कंगना व हृतिकने परस्परांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता कंगना वा हृतिक दोघेही लवकरात लवकर त्यांच्यातील वादावर पडदा टाकू इच्छितात,अशीही बातमी आली. पण पत्रकारांनी कंगनाला या प्रकरणावरून एक ना अनेक प्रश्न विचारले. मग काय, कंगनानेही तोंड उघडलेच. ‘तुम्ही सेलिब्रिटीजला त्यांची पर्सनल स्पेस द्यायला हवी. स्ट्राँग होण्याचा हा अर्थ नाही की, तुम्ही कुठल्याही वाईट गोष्टीमुळे प्रभावित न होता वा कुठल्याही वाईट परिणामासह पुढे जावे. स्ट्राँग होण्याचा अर्थ आहे, वाटेतल्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाणे..’, असे उत्तर कंगनाने दिले आणि तूर्तास मला माझी स्पेस द्या, अशी विनंती करीत पत्रकारांच्या गराड्यातून बाहेर पडली.
......................................
डॅडीने कहां, हृतिकने माना??
अफेअरसंदर्भातील एका वक्तव्यावरून हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यात वाद पेटला आणि एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवण्यापर्यंत हा वाद शिगेला गेला. कंगना व हृतिकने परस्परांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता या प्रकरणाबाबत रोज नव्या बातम्या येत आहे. आता बॉलिवूडमध्ये या निमित्ताने नवीनच चर्चा रंगते आहे. हृतिकने डॅडी राकेश रोशन यांच्या सांगण्यावरून कंगनाला नोटीस बजावली, अशी ही चर्चा आहे. सूत्रांच्या मते, कंगना प्रकरणी कायदेशीर पाऊल उचलावे वा नाही, याबाबत हृतिकने वडिलांचा सल्ला घेतला होता. विशेष म्हणजे, राकेश रोशन यांनीच हृतिकला कंगनाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. अलीकडे हृतिक एका कार्यक्रमात वडिल राकेश रोशन व काका राजेश रोशन यांच्यासोबत एकत्र गेला होता. रेड कार्पेटवर हे तिघेही एकत्र असताना मीडियाने त्यांना कंगना व हृतिकच्या अफेअरबाबत प्रश्न विचारला होता. राकेश रोशन यांना ही बाब चांगलीच खटकली होती. यामुळे हृतिकने कंगनाला अनेकदा इशारा दिला व सरतेशेवटी तिला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला.
...........................................
हृतिक-कंगनाला लवकर संपवायचा आहे वाद?
हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्या कथित अफेअरवरून सुुरू झालेला वाद कोर्टापर्यंत गेला खरा. पण कदाचित असं भांडण्यात काहीही राम नाही, हे कदाचित दोघांनाही पटलयं. ताज्या बातमीनुसार, कंगना वा हृतिक दोघेही लवकरात लवकर या वादावर पडदा टाकू इच्छितात. दोघांनीही हे प्रकरण पुढे नेण्यात रस नाही. दोन्ही पक्षांच्या मते, प्रकरण गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे आणि ते संपवण्याची गरज आहे. कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आम्ही समोरच्या पक्षाचे(हृतिकचे) पुढील पाऊल काय असेल, याची प्रतीक्षा करीत आहोत. हे प्रकरण लवकरात लवकर संपावे, अशी आमची इच्छा आहे, असे सिद्दीकी म्हणाले. तिकडे हृतिक व त्यांचे वकीलही नरमल्याचे दिसत आहे. हृतिकच्या नावाने बनावट ईमेल अकाऊंट प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे. या वादावर लवकर पडदा पडेल, अशी अपेक्षा आहे, असे हृतिकच्या वकीलाने म्हटले.
...............................................................................................
कंगनाचा पलटवार म्हणे, मला पब्लिसिटीसाठी हृतिकची गरज नाही
कंगना-हृतिकची ‘लव्ह स्टोरी’ आता पुरती ‘हेट स्टोरी’त बदलली आहे. काल गुरुवारी हृतिकने कंगनासोबतच्या त्याच्या वादावर आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले. त्यानंतर आज शुक्रवारी दुसºयाच दिवशी कंगनानेही आॅफिशिअल स्टेटमेंट जारी करीत हृतिकवर जोरदार पलटवार केला. केवळ लोकांची सहानुभूती मिळवणे हाच हृतिकचा हेतू आहे. मला मात्र अशा सहानुभूतीची गरज नाही. शिवाय पब्लिसिटीसाठी हृतिकच्या नावाचीही गरज नाही, असे तिने म्हटले आहे.
कंगनाने आपल्या वकीलामार्फत आॅफिशिअल
स्टेटमेंट जारी केले आहे.यात ती म्हणते,
हृतिक केवळ आणि केवळ सहानुभूती लाटण्याच्या प्रयत्नात आहे. मी कधीही हृतिकसाठी ‘सिली एक्स’ या शब्दाचा वापर केलेला नाही. खुद्द हृतिकनेच मला पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये हा शब्द वापरला आहे. मी पब्लिसिटी मिळवण्यासाठी हृतिकच्या नावाचा वापर करतेयं, असा हृतिकचा दावा आहे. पण मला पब्लिसिटीसाठी हृतिकची गरज नाही. हृतिक स्वत: मीडियाला मसाला पुरवत आहेत. त्याने आधी नोटीस धाडले. त्यामुळेच या प्रकरणासाठी मला जबाबदार ठरवता येणार नाही. धमकी देणाºयाला शेवटी परिणामांना सामोर जावेच लागेल. मला न ओळखण्याचा हृतिकचा दावा असेल तर मग माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत हृतिकचे संपूर्ण कुटुंब का हजर असायचे. मी स्वत:ही हृतिकची बहिण आणि वडिलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत जात राहिले आहे, हे जगजाहिर आहे. यावरून हृतिक खोटा बोलतोयं, हे सिद्ध होते. 24 मे 2014 ते 16 फेबु्रवारी 2016 या काळात मी रोज ५० ईमेल पाठवत होते, असा हृतिकचा दावा आहे. असे असेल तर एकूण ३ हजारांवर ईमेल होतात. पण हृतिकने स्वत: माझ्याकडून 1439 ईमेल मिळाल्याचा दावा केला आहे. हा खोटारडेपणा आहे. मी ईमेलवरून त्रास देत होते तर हृतिकने मला ब्लॉक का केले नाही, हाही एक प्रश्नच आहे. माझ्याकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर हृतिक आता स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. यापलीकडे दुसरे तिसरे काहीही नाही.
"Mr. Hrithik’s statements made to the media are nothing but efforts to gain public sympathy. There is enough proof on public platform, which sufficiently proves that Mr. Hrithik Roshan is lying."
...............................................
‘अमूल’च्या जाहिरातीत हृतिक-कंगनाची फाईट
कंगना-हृतिक जोमात मैदानात उतरल्यावर आणि एकमेकांवर बेछूट आरोप-प्रत्यारोप करू लागल्यानंतर त्यांच्याबद्दल बºया-वाईट प्रतिक्रियाही आल्याच. डेअरी प्रॉडक्ट बनणाºया ‘अमूल’ने आपल्या एका जाहिरातील हे प्रकरण अगदी विनोदी पद्धतीने ‘कॅश’ केले आहे. ‘अमूल’ ची ही जाहिरात सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टरवर लेदर टाईट्समधील अॅनिमेटेड हृतिक आणि कंगना एकमेकांशी भांडत असल्याचे दाखवले आहे. त्याखाली कॅप्शन आहे ‘क्रिश अॅण्ड टेल?’ हातात butter knife घेतलेल्या हृतिकची कंगनाशी जुंपली असल्याचे यात दिसत आहे.
...............................................
ब्रेकींग : हृतिकचे आॅफिशिअल स्टेटमेंट अॅज इट इज...
हृतिक रोशन आणि कंगनाच्या ‘लव्ह-हेट स्टोरी’तील एका पाठोपाठ एक असे अनेक डर्टी सिक्रेट उघड होऊ लागल्यानंतरही हृतिक आणि कंगना मात्र चुप्पी साधून होते. पण आता मात्र हृतिकने आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले आहे. गुरुवारी संध्याकाळी हृतिकने आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले. कंगनाला ज्या ईमेल आयडीवरून मेल गेले, ते माझे ईमेल अकाऊंन्ट नव्हतेच, असा दावा हृतिकने यात केला आहे. शिवाय हे प्रकरण खासगी राहावे, यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे संकेतही दिले आहे.
वाचा, १० मिनिटांपूर्वी हृतिकने जारी केलेले इंग्रजीतील स्टेटमेंट जसेच्या तसे...
Here’s what he has to say:
''Anything private that becomes public gives rise to speculation and unnecessary controversies simply because the general public are not privy to the whole truth.
Out of respect for everyone involved, I followed the legal path to resolve the matter in question so as to keep it private. It was a breach of ethics to reveal the contents of a private legal notice. Dignified silence is dignified up to a point, but there comes a time when the silence needs to be broken to protect one’s name, family and image.
The crux of the matter is that the mail id hroshan@email.com does NOT belong to me. I had filed a complaint in this regard with Mumbai Cyber Crime cell on 12 December, 2014 when I learnt of this impersonator communicating with said person. I have absolutely NO CONNECTION with this ID. The entire issue stems from a case of identity theft which has carried over to me. My complaint was reactivated on March 5, 2016 and the crime unit has made headway in tracking this person down. Once that is done, the matter can be laid to rest.
And finally, I believe that mental health is a grave and crucial issue which merits serious discussion. I would never address it flippantly nor use it as a personal attack. Any allegation to the contrary is a misrepresentation of facts. I was requested to keep silent and I did so for 2 years.''
कंगनाला ईमेल पाठवणारा
हृतिक नव्हे कुणी दुसराच???
हृतिकने मला अनेक ईमेल पाठवले होते, असा कंगनाचा दावा आहे. हृतिकला पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये तिने हा दावा केला आहे. हृतिक मात्र हे मानायला तयार नाही. माझ्या नावाने कंगनाशी बोलणारा दुसराच कुणी बहुरूप्या असल्याचे त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याचा छडा लावण्यासाठी हृतिकने मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेची मदत घ्यायचे ठरवले आहे. हृतिकच्या वकीलाने दिलेल्या माहितीनुसार, हृतिकने सर्वप्रथम १२ डिसेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल केली होती. कुणीतरी अज्ञात व्यक्ति ‘एचरोशनएटईमेलडॉटकॉम’ या ईमेल आयडीचा वापर करून माझ्या प्रशंसकांशी बोलत असल्याचे त्याने तक्रारीत म्हटले होते. ५ मार्च २०१६ रोजी हृतिकने पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली आहे..
..............................................................................
२०१४ मध्ये हृतिकने
केले होते कंगनाला प्रपोज?
हृतिक रोशन आणि कंगना रानोट यांच्यातील कथित प्रेमसंबंधांची गाडी रूळावरून घसरली आणि कोर्ट कचेरीपर्यंत जाऊन पोहोचली. आता कंगना व हृतिकच्या कोल्डवॉरमध्ये नवे टिष्ट्वट आले आहे. कंगनाच्या एका अतिशय जवळच्या मैत्रिणीने मीडियासमक्ष एका रहस्यावरून पडदा हटवला आहे. कंगना आणि हृतिक या दोघांनीही हे रहस्य मनात दडवून ठेवले होते. पण आता त्यावरून पडदा उठला आहे. ही लव्ह-हेट स्टोरी त्यामुळे वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.
काय आहे नवे टिष्ट्वस्ट...
हे टिष्ट्वस्ट काहीसे धक्कादायक आहे. कंगनाच्या जवळच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये हृतिकने सुजानला घटस्फोट दिला. यानंतर लगेच त्याने कंगनाला लग्नासाठी प्रपोज केले. ह्यसिटी आॅफ लव्हह्ण म्हणून ओळखल्या जाणाºया पॅरिसमध्ये हृतिकने कंगनाला प्रपोज केले. कंगनाला स्वप्न वाटावे, या पद्धतीने हृतिकने कंगनाला मागणी घातली.
मात्र यानंतर काही महिन्यांतच या प्रेमकहानीला आणखी वेगळे वळण आले. हृतिक ह्यबँग बँगह्णच्या चित्रपटात बिझी झाला. या चित्रपटात त्याची नायिका होती कॅटरिना. काहीच दिवसांत हृतिक आणि कॅटरिनाच्या सलगीच्या बातम्या मीडियात यायला लागल्या. कंगना त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये सुट्या घालवत होती. तिच्या कानावर ही वार्ता जाताच, तिने याबाबत हृतिकला जाब विचारायचे ठरवले. १४ फेबु्रवारीला हृतिकने स्वत: कंगनाला फोन केला. यावेळी कंगनाने त्याला जाब विचारला. शिवाय त्याला शेवटपर्यंत प्रामाणिक राहण्यास बजावले. कंगनाच्या मते, त्यादिवशी हृतिकने फोन केला खरा मात्र त्याला केवळ दोघांच्या रिलेशनबाबत कुणाकुणाला माहिती आहे, हे जाणून घ्यायचे होते. कंगनाने त्याला सांगितले की, यासंदर्भात तिने तिच्या कुटुंबीयांना सांगून चुकली आहे. यानंतर हृतिकने सावरासावर करायला सुरुवात केली...काहीतरी गैरसमज झाल्याचे तो म्हणू लागला...
------------------------------------------------------------------------------
कंगना - हृतिक यांच्यातील कायदेशीर वाद विकोपाला
कंगना रनोट आणि हृतिक यांच्यातील कायदेशीर वाद आता विकोपाला पोहाचला असून हे दोघेही बॉलिवूड कलाकार एकमेकांवर बेछूट आरोप करीत सुटले
आहेत. माझे कंगनासोबत कुठल्याप्रकारचे संबंध नाहीत. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी कंगना माझा वापर करीत आहे, असे ऋतिक म्हणतो आहे. हृतिकने कंगनाला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवल्यानंतर मंगळवारी (१५ मार्च) कंगनानेही या नोटीसला उत्तर देत हृतिकला २१ पानांची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कंगनाने हृतिकवर धमकावण्याचा व दबाव टाकण्याचा आरोप केला आहे. कंगनाने हृतिकला पाच दिवसांचा वेळ देत उत्तर मागितले आहे. शिवाय हृतिकचे सगळे आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचा दावाही केला आहे.
हृतिक व कंगना दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता चर्चा रंगतेय ती या नोटीसमधील परस्परांवरील आरोपांची. तेव्हा वाचू यात, दोघांनीही परस्परांवर काय आरोप केले ते
हृतिकचे आरोप
1. कंगनाने मला १४३९ ईमेल पाठवले होते. यापैकी बºयाच ईमेलकडे मी दुर्लक्ष केले. हे सर्व ईमेल व्यक्तिगत, अभद्र भाषेत लिहिलेले होते.
२. कंगना ही Asperger's syndrome ने ग्रासलेली आहे. यामुळे ती कल्पनेत जगते. कल्पना रंगवते.
कंगनाचे आरोप
कंगनाने स्वत:वरील सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. ती म्हणते, हृतिकनेच माज्याशी बोलण्यासाठी खास ईमेल आयडी तयार केला होता. हृतिक व सुजानचे नाते, त्यांच्यातील घटस्फोट याबाबत हृतिकने अनेकदा माज्याशी वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. मी दिवसाना ५० ईमेल पाठवायची असा हृतिक दावा करतो. असे असेल तर एकूण ६०१ दिवसांत माज्याकडून हृतिकला ३० हजार ईमेल मिळायला हवेत. पण हृतिकने माज्याकडून १४३९ ईमेल मिळाल्याचा दावा केला आहे. यावरूनच त्याचे दावे किती खोटे आहेत, हे कळते.
2. मी नाही तर हृतिक स्वत: मानसिक रूग्ण आहे.
ताज्या बातमीनुसार, कंगनाच्या वकीलांनी ती माफी मागणार नाही, असे सांगत हृतिकला दुसरी नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की, मी कधीही कुणाचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही.
................................................................................
एका ‘आई’ने घेतली कंगनाची बाजू
हृतिकला खुले पत्र
कंगना-हृतिकच्या कोल्डवॉर काहीसे ‘सोशल’ होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, या कोल्डवॉरमध्ये अनेकांनी कंगनाला पाठींबा देत, हृतिकला धोबीपछाड दिले आहे. कंगनाबद्दल हृतिकने लिहिलेले शब्द आणि तिच्यावर केलेले बेछूट आरोप, सभ्यतेच्या मर्यादा लांघणारे असल्याचे अनेकांचे मत आहे. हृतिकने कंगनाच्या मानसिक आरोग्याबाबत भाष्य करीत कंगनाAsperger's syndrome ची रूग्ण असल्याचा आरोप हृतिकने केला आहे. हृतिकच्या या आरोपामुळे अनेकजण दुखावले आहेत. एका ९ वर्षांच्या मुलाची आई असलेल्या महिलेने या अशा वागण्याबद्दल हृतिकचा चांगलाच समाचार घेतला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा ९ वर्षांचा चिमुकला स्वत: Asperger's syndromeचा रूग्ण आहे. अ२स्री१ॅी१ह्ण२ र८ल्ल१िङ्मेी बद्दल अज्ञान असताना कंगनाला हा आजार असल्याचे जाहिर वक्तव्य करणे, चुकीचे आहे. एक सेलिब्रिटी असताना हृतिकने असे बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे आहे. मी तर म्हणेल, यासाठी हृतिकने कंगनाची क्षमा मागायला हवी, असे या आईने आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे.