हृतिक रोशन की टायगर श्रॉफ? डब्बू रतनानीच्या ‘शर्टलेस’ कॅलेंडरमध्ये कोण ठरले सर्वात हॉट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 11:15 IST2017-01-12T11:15:30+5:302017-01-12T11:15:53+5:30

दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलीवूड सेलिब्रेटींनी प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केला. यंदाच्या थीमनुसार आपले लाडके स्टार्स पूर्णपणे ‘टॉपलेस’ ...

Hrithik Roshan's Tiger Shroff? Who is the most hot in the 'Shirtless' calendar of Dabu Ratanani? | हृतिक रोशन की टायगर श्रॉफ? डब्बू रतनानीच्या ‘शर्टलेस’ कॅलेंडरमध्ये कोण ठरले सर्वात हॉट?

हृतिक रोशन की टायगर श्रॉफ? डब्बू रतनानीच्या ‘शर्टलेस’ कॅलेंडरमध्ये कोण ठरले सर्वात हॉट?

वर्षी प्रमाणे यंदाही बॉलीवूड सेलिब्रेटींनी प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केला. यंदाच्या थीमनुसार आपले लाडके स्टार्स पूर्णपणे ‘टॉपलेस’ झाले आहेत. शर्ट काढून आपल्या पीळदार बॉडीमधील त्यांचे हे फोटो पाहून तुम्ही पण म्हणाल की, क्या हॉट पिक है!

बॉलीवूड हंक  हृतिक रोशन, सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंग आणि प्रथमच या कॅलेंडरमध्ये फिचर होणारा टायगर श्रॉफने त्यांच्या ‘ड्रीम बॉडी’चे विविध प्रकारे दर्शन घडविले आहे. हृतिक रोशन तर जणू काही या कॅलेंडरचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. त्यांचा फोटोवरून तर कोणाचीही नजर हटणार नाही.

                                    Hrithik
                                    

सिद्धार्थ मल्होत्राचा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ बेअर चेस्ट फोटो त्याचे वेगळे रुप दाखवणारा आहे. या इंटेन्स फोटोमध्ये तो ‘माझ्याकडे या’ अशा अविर्भावात पाहतोय. सदैव ऊर्जावान राहणाऱ्या रणवीर सिंगचा ‘टॉपलेस वेट लूक’ म्हणजे हॉटनेसची परिसीमाच म्हणावी लागेल. रॉ, डॅशिंग, माचो लूकमधील हा रणवीर तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल.

                                    Siddharth
                                    सिद्धार्थ मल्होत्रा

                                   Ranveer
                                   रणवीर सिंग

पहिल्यांदाच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरवर झळकणारा टायगर श्रॉफ यंदाचे विशेष आकर्षण ठरला. के्रनवर एका हाताने लटकून त्याने दिलेली पोज म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या लवचिक बॉडीचा उपयोग करून घेतल्यासारखे आहे. पहिल्यावहिल्या फोटोशूटबद्दल तो म्हणाला की, ‘मला जेव्हा या कॅलेंडरसाठी विचारणा करण्यात आली तेव्हा खूप आनंद झाला. अनेक दिग्गज स्टार्स यासाठी फोटोशूट करतात. त्यात मीदेखील सहभागी होतोय म्हटल्याचा खूप एक्सायटमेंट होती.’

                                   Tiger
                                   टायगर श्रॉफ

या चार हॉट अ‍ॅक्टर्सबरोबरच शाहरुख खान, फरहान अख्तर, वरुण धवन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अर्जुन रामपाल यांनीसुद्धा कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. याबरोबरच काही तारकांनीसुद्धा टॉपलेस फोटोज् दिलेले आहेत.

                                  Disha
                                  दिशा पटाणी

सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी पोज करणे आता बॉलीवूड स्टार्ससाठी नित्याचे झाले आहे. तर मग या फोटोंमध्ये सर्वात हॉट कोण दिसतोय हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Web Title: Hrithik Roshan's Tiger Shroff? Who is the most hot in the 'Shirtless' calendar of Dabu Ratanani?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.