हृतिक रोशनची लेडी लव्ह सबानं व्यक्त केली खंत, म्हणाली - "मी दगडाची बनलेली नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 07:34 PM2023-10-02T19:34:47+5:302023-10-02T19:35:07+5:30

Saba Aazad : अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या नात्यामुळे ट्रोल होण्यावर आता सबा आझादने मौन सोडले आहे. अभिनेत्री म्हणाले की, हे ऐकून खूप वाईट वाटतं.

Hrithik Roshan's lady love Saba expresses regret, says - "I am not made of stone..." | हृतिक रोशनची लेडी लव्ह सबानं व्यक्त केली खंत, म्हणाली - "मी दगडाची बनलेली नाही..."

हृतिक रोशनची लेडी लव्ह सबानं व्यक्त केली खंत, म्हणाली - "मी दगडाची बनलेली नाही..."

googlenewsNext

अभिनेत्री सबा आझादची 'हू इज युअर गायनॅक' ही वेबसीरिज आता अॅमेझॉन मिनी टीव्हीवर प्रदर्शित झाली आहे. पण सबा सीरिजपेक्षा अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या नात्यामुळे जास्त चर्चेत असते. यामुळे अभिनेत्रीला अनेकदा ट्रोल केले जाते. ज्यावर तिने आता मौन सोडले आहे.

एका पोर्टलशी बोलताना सबा आझाद म्हणाली, "मला घरी राहायला आवडते म्हणून मी फार कमी बाहेर जाते. त्यामुळे सुरुवातीला मला ते खूप भीतीदायक वाटले. कारण मला याआधी असे कधीच वाटले नव्हते. मात्र, आता मला समजले की पापाराझी त्यांचे काम करत आहेत. पण त्यांच्यावर कोणी लक्ष ठेवलेले त्यांना आवडत नाही.

मी दगडाची नाही - सबा आझाद
हृतिक रोशनसोबतच्या नात्यामुळे ट्रोल झाल्याबद्दल सबा म्हणाली, "मी दगडाची नाही, त्यामुळे मलाही खूप वाईट वाटतं... माझ्या आयुष्यात असे अनेक दिवस येतात, जेव्हा तुम्ही जागता, विचार करता की तुम्ही कधी असे कोणाशीही केले आहे. पण आता मला समजले आहे की मी लोकांच्या विचारांना जबाबदार नाही, त्यामुळे आता मला जीवनात शांतता वाटते.''

हृतिक-सबा एकमेकांवरील व्यक्त करतात प्रेम
हृतिक रोशन आणि सबाने गेल्या वर्षी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. आता दोघांनीही आपले नाते अधिकृत केले आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट केले जातात आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात. याशिवाय सबा अभिनेत्याच्या फॅमिली फंक्शन्सलाही हजेरी लावत असते.

Web Title: Hrithik Roshan's lady love Saba expresses regret, says - "I am not made of stone..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.