​हृतिक रोशनमुळे आपल्या मॅनेजरवर बरसली कंगना राणौत! वाचा, सविस्तर बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 12:16 IST2017-10-15T06:46:29+5:302017-10-15T12:16:29+5:30

कंगना राणौतसोबत सुरु असलेल्या वादावर हृतिक रोशन आत्ताआत्तापर्यंत शांत होता. पण अलीकडे तो उघडपणे बोलला. अगदी नॅशनल टीव्हीवर बोलला. ...

Hrithik Roshan's birthday! Read, detailed news !! | ​हृतिक रोशनमुळे आपल्या मॅनेजरवर बरसली कंगना राणौत! वाचा, सविस्तर बातमी!!

​हृतिक रोशनमुळे आपल्या मॅनेजरवर बरसली कंगना राणौत! वाचा, सविस्तर बातमी!!

गना राणौतसोबत सुरु असलेल्या वादावर हृतिक रोशन आत्ताआत्तापर्यंत शांत होता. पण अलीकडे तो उघडपणे बोलला. अगदी नॅशनल टीव्हीवर बोलला. त्याआधी कंगनाने हृतिकसोबतच्या तिच्या कथित अफेअरवर नको ते खुलासे केले होते. कंगना कायम बोलत सुटली होती. इतकी की, ‘सिमरन’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही सगळ्यांचे लक्ष तिच्या अन् हृतिकच्या वादावरच होते. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर घणाघाती आरोप केले होते. हृतिक सोबत माझे अफेअर होते, मी त्याच्याशी लग्न करायलाही तयार होते. हृतिकनेही पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर लग्नाची तयारी दर्शवली होती. पण नंतर तो पलटला आणि माझे पर्सनल मॅसेज व व्हिडिओ लीक करण्याची धमकी मला दिली, असे काय काय कंगना या शोमध्ये बोलली होती. हृतिकने माझी माफी मागावी, तोपर्यंत हा वाद थांबणार नाही,असे ती म्हणाली होती. कंगनाच्या या आरोपानंतर अलीकडे हृतिकनेही एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले होते. शिवाय यानंतरअर्नब गोस्वामींच्या टीव्ही शोवर पोहचत  आपली बाजू मांडली होती. हृतिकच्या या मुलाखतीनंतर कंगना पुन्हा एकदा एकदा हृतिकविरोधात मैदानात उतरेल, असेच सगळ्यांना वाटले होते. पण असे न होता,उलट हृतिकच्या मुलाखतीनंतर कंगना मीडियाला टाळू लागली आहे. 



ALSO READ: Shocking Revelations !! कंगना राणौतच्या आरोपांना हृतिक रोशनने अशी दिली उत्तरे!

ब-याच दिवसानंतर कालपरवा कंगना मामी फिल्म फेस्टिवल2017मध्ये दिसली. साहजिक मीडियाने कंगनाला बघताच तिचा पिच्छा पुरवणे सुरु केले. हृतिकच्या मुलाखतीनंतर कंगना काय बोलते, हे मीडियाला जाणून घ्यायचे होते. पण या इव्हेंटमध्ये कंगना रेड कार्पेटवर आली, मीडियाला पोज दिली अन् आली तशी निघून गेली. याचदरम्यान कंगनाच्या मॅनेजरने कंगनाला समजवण्याचा प्रयत्न केला. हृतिकच्या विषयावर तू उघडपणे बोलायला हवे, असे मॅनेजरने कंगनाला म्हटले. पण यामुळे कंगनाचा पारा अचानक चढला आणि ती मॅनेजरवर  चांगलीच बरसली. अनेकजणांनी मॅनेजरवर बरसणारी कंगना यावेळी पाहिली.

आता कंगनाच्या मनात नेमके काय आहे, कळायला मार्ग नाही. कालपरवा पर्यंत हृतिकवर वेगवेगळे आरोप करणारी कंगना आता इतकी गप्प का? हाच प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

Web Title: Hrithik Roshan's birthday! Read, detailed news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.