हृतिक रोशनने 'या' प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्रीसोबत बालपणी केले होते नृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:44 IST2016-12-18T18:17:45+5:302016-12-19T10:44:28+5:30
hrithik roshan dance in childhood with sridevi ; बालकलाकार म्हणून हृतिकने अनेक चित्रपटात काम केले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ त्याच्या बालपणीचा असून तो ‘भगवान दादा’ या चित्रपटात श्रीदेवीसोबत डान्स करताना दिसत आहे.

हृतिक रोशनने 'या' प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्रीसोबत बालपणी केले होते नृत्य
सुमारे तीस वर्षांपूर्वी ‘भगवान दादा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भगवान दादा या चित्रपटातील ‘चुग गई चिड़िया जो खेत फिर पछताओगे’ या गाण्यात बालकलाकार म्हणून हृतिक रोशन ‘डान्सिंग क्वीन’ श्रीदेवी सोबत डान्स करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहताना हृतिक रोशनचा डान्स नजरेत भरणारा आहे. यावर हा अंदाज लावता येतो की, हृतिकला डान्स लहानपणापासूनच आवडत होता.
१९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘भगवान दादा’ या चित्रपटात राकेश रोशन, श्रीदेवी व रजनीकांत यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात हृतिकने रजनीकांतच्या मुलाची भूमिका केली होती. त्यावेळी हृतिक १२ वर्षांचा होता. हृतिकच्या तेव्हाच्या स्टेप्स व आजचा त्याचा डान्स जवळपास सारखा असल्याचे हे या व्हिडीओमधून पाहता येते.
२५ जानेवारीला हृतिक रोशन व यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेला काबिल हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. राकेश रोशन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. यानंतर हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला सुपरहिरो सिरीजचा ‘क्रिश’च्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. दरम्याच्या काळात त्याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.