रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील रावणाची भूमिका हृतिक रोशनने नाकारली, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:32 IST2025-07-03T18:31:53+5:302025-07-03T18:32:28+5:30

Ramayana: नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. तर रावणाची भूमिका करण्यासाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती पण नंतर त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला.

Hrithik Roshan turned down the role of Ravana in Ranbir Kapoor's 'Ramayana', the reason came to light | रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील रावणाची भूमिका हृतिक रोशनने नाकारली, कारण आलं समोर

रणबीर कपूरच्या 'रामायण'मधील रावणाची भूमिका हृतिक रोशनने नाकारली, कारण आलं समोर

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' (Ramayan Movie) चित्रपटाचा टीझर आज भेटीला आला. टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात रामाच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दिसणार आहे. तर सीताच्या भूमिकेत अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) आहे. रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश (Yash) दिसणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की यशच्या आधी रावणाच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन(Hritik Roshan)ची निवड करण्यात आली होती. पण त्याने ही भूमिका नाकारली. दरम्यान आता त्याने ही भूमिका नाकारल्यामागचं कारण समोर आलं आहे.

नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटासाठी जेव्हा हृतिक रोशनचे नाव समोर आले तेव्हा चाहते खूप खूश झाले होते. भगवान रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरच्या विरुद्ध रावणाच्या भूमिकेत हृतिकची भूमिका साकारल्याबद्दल बरीच चर्चा झाली. पण नंतर बातमी आली की हृतिकने या चित्रपटातून माघार घेतली. हृतिकने रावणाची भूमिका नाकारल्या मागचे कारण समोर आले आहे. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की त्याला या चित्रपटाची पटकथा खूप आवडली आणि तो या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक होता. परंतु अलीकडेच त्याने अशा अनेक गंभीर भूमिका साकारल्या आहेत की हृतिक पुन्हा खलनायकाची भूमिका करू इच्छित नव्हता.

यशची रावणाच्या भूमिकेसाठी केली निवड
मीडिया रिपोर्टनुसार, हृतिकला असे वाटले की चाहते अजूनही त्याच्याशी अभिनेता म्हणून जोडले जातात. नितेश तिवारी आणि निर्मिती टीमशी अनेक चर्चा केल्यानंतर, हृतिकने 'रामायण' पासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. तो बाहेर पडल्यानंतर, निर्मात्यांना हृतिकशी मिळताजुळता एक नवीन रावण शोधावा लागला. परंतु, त्यांना त्याला शोधण्यासाठी जास्त वेळ लागला नाही आणि नंतर 'केजीएफ' सुपरस्टार यशला या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले. यशनेही या भूमिकेत इंटरेस्ट दाखवला आणि या भूमिकेसाठी होकार दिला. 'रामायण'चे दोन भागांमध्ये चित्रीकरण केले जात आहे आणि पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Hrithik Roshan turned down the role of Ravana in Ranbir Kapoor's 'Ramayana', the reason came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.