​ हृतिक रोशन जर्मनीत शोधतोय डिप्रेशनवर इलाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 16:24 IST2017-02-24T10:54:21+5:302017-02-24T16:24:21+5:30

‘काबील’चे यश हृतिक रोशनसाठी निश्चितपणे आनंदाची बाब आहे. पण या आनंदाने हृतिकच्या आयुष्यातली एक समस्या मात्र मुळीच कमी झालेली ...

Hrithik Roshan is searching for depression treatment in Germany! | ​ हृतिक रोशन जर्मनीत शोधतोय डिप्रेशनवर इलाज!

​ हृतिक रोशन जर्मनीत शोधतोय डिप्रेशनवर इलाज!

ाबील’चे यश हृतिक रोशनसाठी निश्चितपणे आनंदाची बाब आहे. पण या आनंदाने हृतिकच्या आयुष्यातली एक समस्या मात्र मुळीच कमी झालेली नाही. होय, ही समस्या म्हणजे डिप्रेशन. होय, डिप्रेशनच्या आजाराने हृतिकला हैराण करून सोडले आहे. अखेर स्वत:ला मानसिकदृष्ट्या रिलॅक्स करण्यासाठी हृतिकने जर्मनी गाठले आहे.  एका जवळच्या मित्राने हृतिकला जर्मनीच्या एका हेल्थ स्पामध्ये काही काळ उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. मित्राचा हा सल्ला न मानण्याचे काहीही कारण नव्हते. मग काय, हृतिकने थेट प्लॅनिंग केले अन् तो जर्मनीला रवानाही झाला. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हृतिक याठिकाणी राहणे अपेक्षित आहे.
गेले वर्ष हृतिकसाठी बरेच तणावाचे ठरले. मग ते कंगना राणौतसोबतचा वाद असो वा तुटलेले लग्न. त्यातच व्यावसायिक पातळीवरील अपयशही आडवे आले. त्यामुळे हृतिक डिप्रेशनमध्ये गेला. यादरम्यान हृतिकने मुलांसोबत ट्रिप प्लान करून स्वत:ला रिलॅक्स करण्याचे प्रयत्न करून पाहिले. पण ते प्रयत्न फारसे कामी आले नाहीत. त्यामुळे आता हृतिकने पुन्हा काही वेळ स्वत:ला द्यायचे ठरवलेय.

ALSO READ : कंगना राणौतचा आरोप : हृतिकने माझे करिअर संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केलेत
 हृतिक रोशन आणि सुझैन खान यांच्यात आले पुन्हा प्रेम ऊतू...

गतवर्षी आलेला हृतिकचा ‘मोहेंजोदडो’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. त्यानंतर ‘काबील’ आला. या चित्रपटाने हृतिकला मोठे यश मिळवून दिले आणि हृतिक पुन्हा एकदा आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत दाखल झाला.  पण मानसिक सुखाशिवाय कुठलाही आनंद कामाचा नाही. आनंद साजरा करायलाही मानसिक स्वास्थ्य चांगले असायला लागते. कदाचित हे हृतिकला कळून चुकले आहे. त्यामुळे हृतिकने थेट जर्मनीची वाट धरलीय. हृतिकला या प्रयत्नात यश यावे आणि नैराश्येच्या गर्तेतून तो बाहेर पडावा, याच शुभेच्छा देऊ यात!

Web Title: Hrithik Roshan is searching for depression treatment in Germany!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.