​कंगना राणौतसोबतच्या भांडणात हृतिक रोशन नाही एकटा; मिळाला एक्स-वाईफ सुजैन खानचा पाठींबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:03 IST2017-09-04T06:10:04+5:302017-09-04T13:03:10+5:30

कंगना राणौत आणि हृतिक रोशन या दोघांचे अफेअर आणि त्यावरून रंगलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘आप की ...

Hrithik Roshan is not alone in fight with Kangana Ranaut; X-Wife Susan Khan's support! | ​कंगना राणौतसोबतच्या भांडणात हृतिक रोशन नाही एकटा; मिळाला एक्स-वाईफ सुजैन खानचा पाठींबा!

​कंगना राणौतसोबतच्या भांडणात हृतिक रोशन नाही एकटा; मिळाला एक्स-वाईफ सुजैन खानचा पाठींबा!


/>कंगना राणौत आणि हृतिक रोशन या दोघांचे अफेअर आणि त्यावरून रंगलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘आप की अदालत’ या शोमध्ये कंगना आली अन् तिने जणू मनातील सगळी भडास काढली. आदित्य पांचोलीपासून तर हृतिक रोशनपर्यंत सगळ्यांसोबत असलेल्या रिलेशनबद्दल कुठलाही आडपडदा न ठेवता ती बोलली. हृतिकबद्दल तर तिने बरेच धक्कादायक खुलासे केलेत. हृतिक सोबत माझे अफेअर होते, मी त्याच्याशी लग्न करायलाही तयार होते. हृतिकनेही पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर लग्नाची तयारी दर्शवली होती. पण नंतर तो पलटला आणि माझे पर्सनल मॅसेज व व्हिडिओ लीक करण्याची धमकी मला दिली, असे काय काय कंगना या शोमध्ये बोलली. हृतिकने माझी माफी मागावी, तोपर्यंत हा वाद थांबणार नाही, असेही कंगना यावेळी बोलून गेली.



आता कंगनाच्या या आरोपांवर हृतिक तर काहीही बोलला नाही. पण हृतिकची एक्स वाईफ सुजैन खान हिने मात्र कंगनाला अप्रत्यक्ष लाथाडले आहे. होय, सुजैन हृतिकच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. माझा हृतिकवर पूर्ण विश्वास आहे. भविष्यातही त्याच्यावरचा विश्वास कमी होणार नाही, असे तिने म्हटले आहे. कोणत्याही आरोपांमध्ये आणि कटकारस्थानांमध्ये एवढी शक्ती नाहीये की, ती एका चांगल्या व्यक्तीवर विजय मिळवू शकेल,असे टिष्ट्वट तिने केले आहे. शिवाय हृतिकसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
२०१४ मध्ये हृतिक आणि सुजैन यांनी घटस्फोट घेतला होता. पण घटस्फोटानंतरही हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. तिच्या या ताज्या मेसेजवरुनही या दोघांमध्ये सध्या कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे दिसते. आता फक्त या मॅसेजवर कंगना काय प्रतिक्रिया देते, ते बघायचेयं.

Web Title: Hrithik Roshan is not alone in fight with Kangana Ranaut; X-Wife Susan Khan's support!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.