ह्रतिक रोशनच्या अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल, आता तिला ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 14:05 IST2022-08-06T13:53:58+5:302022-08-06T14:05:03+5:30
ह्रतिक रोशनच्या या अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याची संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत चर्चा होती, मात्र आता तिला ओळखणंही कठीणं झालंय.

ह्रतिक रोशनच्या अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल, आता तिला ओळखणंही झालंय कठीण
हृतिक रोशनचा 2000 साली प्रदर्शित झालेला 'फिजा' हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. हृतिकच्या कारकिर्दीतील हा दुसरा चित्रपट होता. कहो ना प्यार है नंतर या अभिनेत्याची क्रेझ खूप वाढली होती, त्यामुळे लोक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात करिश्मा कपूरही मुख्य भूमिकेत होती, फिजा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.
दोघांशिवाय या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याची संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत चर्चा होती. या अभिनेत्रीचे नाव शबाना रझा. या चित्रपटात शबानाला हृतिक अपोझिट कास्ट करण्यात आले होते. चित्रपटातील 'आ धूप मलून में' हे गाणे आजही लोकांना आवडते.
अनेक सिनेमांमध्ये केलंय काम
शबानाच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1998 मध्ये 'करीब' या सिनेमातून झाली. हा विधू विनोद चोप्राचा चित्रपट होता. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत झळकली होती. विधू विनोद चोप्रानेच तिचे नाव शबाना वरून बदलून नेहा केले. तेव्हापासून लोक तिला नेहा म्हणून ओळखतात. 'करीब'शिवाय ती अजय देवगणसोबत 'होगी प्यार की जीत'मध्येही दिसली आहे. याशिवाय तिने 'कोई मेरे दिल में है', 'ऍसिड फॅक्टरी'मध्येही काम केले आहे.
नेहा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांची पत्नी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघींची भेट 'करीब' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर त्यांचे प्रेम फुलले आणि दोघांनी लग्न केले. लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा व मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे तिचं नाव नैला आहे. लग्नानंतर नेहा चित्रपटांपासून दूर होती. ती आपला सर्व वेळ कुटुंबासाठी देते. तिचा लुकही आता पूर्णपणे बदलला आहे. नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते.