हृतिक राहिला बाजूला, एक्स पत्नी सुजैनसोबत गर्लफ्रेंड सबा आजादची पार्टी; गळ्यात गळे टाकून दिल्या पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 09:53 AM2024-04-01T09:53:07+5:302024-04-01T09:53:42+5:30

हृतिकची एक्स पत्नी आणि गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे. एकमेकींचं तोंडही न पाहणऱ्या सुजैन आणि सबाने सवत माझी लाडकी म्हणत चक्क पार्टी केली आहे. 

hrithik roshan ex wife sussaine khan and gf saba azad posing together for photo | हृतिक राहिला बाजूला, एक्स पत्नी सुजैनसोबत गर्लफ्रेंड सबा आजादची पार्टी; गळ्यात गळे टाकून दिल्या पोज

हृतिक राहिला बाजूला, एक्स पत्नी सुजैनसोबत गर्लफ्रेंड सबा आजादची पार्टी; गळ्यात गळे टाकून दिल्या पोज

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन करिअरपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. सुजैन खानला घटस्फोट देत संसार मोडल्यानंतर हृतिक सबा आजादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक कार्यक्रम, इव्हेंट आणि पार्टीमध्येही हृतिक सबाबरोबर हजेरी लावताना दिसतो. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत असतात. पण, आता मात्र हृतिकची एक्स पत्नी आणि गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे. एकमेकींचं तोंडही न पाहणऱ्या सुजैन आणि सबाने सवत माझी लाडकी म्हणत चक्क पार्टी केली आहे. 

हृतिक आणि सुजैनचा मुलगा ऋहानचा १८वा वाढदिवस नुकताच गोव्यात साजरा करण्यात आला. या पार्टीत हृतिकची एक्स पत्नी आणि गर्लफ्रेंड सबादेखील उपस्थित होती. या पार्टीतील त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. हृतिकची एक्स पत्नी सुजैन खानने सबा आझादबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "तू दिलेल्या प्रेमासाठी सबा थँक्यू डार्लिंग" असं हृतिकच्या एक्स पत्नीने म्हटलं आहे. तर सुजैनची स्टोरी सबाने रिशेअर केली आहे. "आतापर्यंतच्या सर्वात चांगल्या क्षणांसाठी सूज थँक्यू", असं सबाने म्हटलं आहे. सुजैन आणि सबाची मैत्री इतकी घट्ट झाली आहे की त्यांनी एकमेकींसाठी निक नेमही ठेवले आहेत. सुजैन सबाला साबू तर सबा सुजैनला सूज या नावाने हाक मारते. 

हृतिकने अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सुजैन खानशी २००० साली विवाह केला होता. लग्नानंतर १३ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. सध्या हृतिक सबा बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर सुजैन खान अर्सलन गोनीला डेट करत आहे. 

Web Title: hrithik roshan ex wife sussaine khan and gf saba azad posing together for photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.