नव्या नवरीला दारातच थांबवलं! राकेश रोशन यांचे तृतीयपंथींशी वाद, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:56 IST2025-12-24T14:47:53+5:302025-12-24T14:56:20+5:30

हायव्होल्टेज ड्रामा! ट्रान्सजेंडर्सनी अडवला रस्ता; राकेश रोशन यांचा पारा चढला, नेटकऱ्यांनीही ओढले ताशेरे

Hrithik Roshan Cousin Ishan Wedding Controversy Rakesh Roshan Angry On Transgenders Video Viral | नव्या नवरीला दारातच थांबवलं! राकेश रोशन यांचे तृतीयपंथींशी वाद, व्हिडीओ व्हायरल

नव्या नवरीला दारातच थांबवलं! राकेश रोशन यांचे तृतीयपंथींशी वाद, व्हिडीओ व्हायरल

Rakesh Roshan Angry On Transgenders Video Viral : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित घराण्यांपैकी एक असलेल्या रोशन कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशन हा काल २३ डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. ईशान रोशन आणि ऐश्वर्या सिंह यांचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या दोघांच्या लग्नासाठी संपूर्ण रोशन कुटुंब एकत्र आलं होतं. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, लग्नाचा आनंद साजरा करून कुटुंब घरी परतत असतानाच एका अनपेक्षित घटनेमुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रसिद्ध दिग्दर्शक व हृतिकचे वडील राकेश रोशन यांचे तृतीयपंथींशी वाद झाल्याचं पाहायला मिळालंय. ईशान आणि ऐश्वर्या लग्नानंतर घरी पोहोचले. यावेळी वधू ऐश्वर्या बसमधून उतरताच काही तृतीयपंथी व्यक्तींनी तिचा मार्ग अडवला आणि शुभेच्छा देऊ लागले. मात्र, काही वेळातच या शुभेच्छांचे रूपांतर वादात झालं. हृतिकचे वडील राकेश रोशन आणि तृतीयपंथी व्यक्ती यांच्यात शाब्दिक वाद झाला. राकेश रोशन यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते अत्यंत रागात असल्याचे स्पष्ट दिसत होतं.


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. एका युजरने म्हटले, "ते अभिनंदन करायला नाही, तर खंडणी मागायला आले आहेत. हे प्रत्येक शहरात चालणारं मोठं रॅकेट आहे". दुसऱ्याने लिहिले, "त्यांनी नक्कीच १० लाख रुपये मागितले असणार, सेलिब्रिटी आहेत म्हणून लुटायचं का?".


 

 

Web Title: Hrithik Roshan Cousin Ishan Wedding Controversy Rakesh Roshan Angry On Transgenders Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.