हृतिकने केली ट्विंकलबाबत तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 11:11 IST2016-11-19T11:08:09+5:302016-11-19T11:11:47+5:30

वाचून हैराण झाला ना? कंगनानंतर आता ट्विंकल खन्नाने हृतिकला काय त्रास दिला की तो तिची तक्रार करत आहे? काय ...

Hrithik complains about twinkle! | हृतिकने केली ट्विंकलबाबत तक्रार!

हृतिकने केली ट्विंकलबाबत तक्रार!

चून हैराण झाला ना? कंगनानंतर आता ट्विंकल खन्नाने हृतिकला काय त्रास दिला की तो तिची तक्रार करत आहे? काय बिनसले असेल दोघांमध्ये? असे जर तुम्हाला वाटत असेल तर चिंता नसावी.

कारण हृतिकची तिच्याबाबत ‘गोड’ तक्रार आहे. त्याचे झाले असे की, ट्विंकल खन्नाने लिहिलेले ‘द लेजेंड आॅफ लक्ष्मीप्रसाद’ हे पुस्तक नुकतेच लाँच करण्यात आले. हृतिक आणि ट्विंकल एकाच इमारतीमध्ये राहतात. म्हणजे एकमेकांचे शेजारी. आता शेजारी म्हटल्यावर त्याला पुस्तकाची एक कॉपी मिळण्याची अपेक्षा होती. ती न मिळाल्यामुळे त्याने ट्विटरवर याबाबत तक्रार केली. 

‘ट्विंकल सध्या सगळीकडे तुझ्या पुस्तकाची चर्चा आहे. शेजारी राहत असूनही अद्याप मला ते मिळालेले नाही. आपले घर एवढे जवळजवळ आहे की, तु घरातून पुस्तक फेकूनही मला देऊ शकते’, असे त्याने ट्विट केले.
                                      
शेजाऱ्याच्या अशा जाहीर टीकेमुळे गप्प बसेल ती ट्विंकल कसली. नेहमीच्याच विनोदशैलीत तिने ट्विट करून त्याला उत्तर दिले की, ‘फ्रीस्बी जशी फेकतात तसेच तुला पुस्तकही फेकू न पाठवते. शेवटी शेजार धर्म तर पाळावाच लागेल ना!’ ट्विटरवर दोघांचे हे ‘फ्रेंडली’ भांडण चांगलेच गाजले.
                                       
रिअल लाईफमध्ये अभिनेत्री, पत्नी आणि आई अशा भूमिका पार पडल्यानंतर ट्विंकल लेखक म्हणून नाव कमवत आहे. ‘मिसेस फनीबोन’ या नावाने ती खुसखुशीत शैलीत लिखाण करत असते. तिने लिहिलेले हे दुसरे प्रकाशित पुस्तक असून प्रकाशन सोहळ्यात करण जोहर, आलिया भट, रणबीर कपूर, अक्षय कुमार असे इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. (पाहा गॅलरी)

तिकडे हृतिकच्या वैयक्तिक जीवनातील वादळ काही शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कंगना राणौतशी असलेल्या ‘ई-मेल’ वादाची चौकशी पोलिसांनी बंद केली असल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र शुक्रवारी (दि. १८ नोव्हेंबर) हृतिकच्या वकिलांनी वाद संपला नसून मीडियातील बातम्या चुकीच्या असल्याचा दावा केला आहे.


ईमेल एनेमी :कंगना राणौत आणि हृतिक रोशन

आधी घटस्फोट, मग कंगना प्रकरण आणि नंतर व्यावसायिक अपयश (मोहेंजोदडो : फ्लॉप) अशा हरतऱ्हेने हृतिकसाठी हे वर्ष खडतर ठरत आहे. असे असताना ट्विंकलशी केलेली थट्टा मस्करी पाहून तो मन प्रसन्न ठेवून आहे असे दिसतेय. येत्या जानेवारी महिन्यात त्याचा यामी गौतमीसोबत ‘काबील’ चित्रपट येत आहे. यामध्ये तो अंध प्रियकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Hrithik complains about twinkle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.