हृतिकने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 21:50 IST2016-03-30T23:13:01+5:302016-04-03T21:50:08+5:30

आपल्या टिष्ट्वटमध्ये ‘पोप’ यांचा उल्लेख करणाºया हृतिक रोशनला उपरती झाली आहे. माझ्या हातून अनावधानाने चूक झाली, असे सांगत आपल्या ...

Hrithik asks for forgiveness | हृतिकने मागितली माफी

हृतिकने मागितली माफी

ल्या टिष्ट्वटमध्ये ‘पोप’ यांचा उल्लेख करणाºया हृतिक रोशनला उपरती झाली आहे. माझ्या हातून अनावधानाने चूक झाली, असे सांगत आपल्या टिष्ट्वटबद्दल हृतिकने माफी मागितली आहे. ‘हिज होलीनेस’बाबत मी केलेल्या टिष्ट्वटचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे मला जाणवले. माझ्या टिष्ट्वटमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो. असे अनावधानाने झाले, अशा शब्दांत हृतिकने क्षमायाचना केली आहे.
 हृतिकने आपल्या एका टिष्ट्वटमध्ये पोपच्या नावाचा उल्लेख केला होता. यामुळे महाराष्ट्र अल्पसंख्यक आयोगाचे माजी उपाध्यक्ष अब्राहम मथाई यांनी ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्याच्या आरोप करीत हृतिकला कायदेशीर नोटीस धाडले होते.  सात दिवसांच्या आत जाहिर माफी मागावी अन्यथा फौजदारी तक्रार दाखल करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले होते. हृतिकने आपल्या टिष्ट्वटमध्ये पोप यांच्या नावाचा उल्लेख करीत कंगना रानोट हिला लक्ष्य केले होते.  ज्या महिलेसोबत माझ्या अफेअरचा दावा केला जात आहे, तिच्यापेक्षा मी पोप सोबत अफेअर करणे पसंत करेल, अशा आशयाचे टिष्ट्वट त्याने केले होते. कंगनाच्या एका वक्तव्यानंतर हृतिकने हे टिष्ट्वट केले होते. ‘मला अनेक अफवा ऐकायला येत आहे. एक्सेस(एक्स बॉयफ्रेंड) लोकप्रीयता मिळवण्यासाठी अशाप्रकारे वेड्यासारख्या गोष्टी का करतात, मला कळत नाही,’ असे कंगना म्हणाली होते. तिचा इशारा हृतिककडे होता. कंगनाच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना हृतिकने पोप संदर्भातील टिष्ट्वट केले होते. या प्रकरणावरून हृतिक व कंगना परस्परांना कायदेशीर नोटीस पाठवून चुकले आहेत.  
..................................

​पोप यांचा उल्लेख   हृतिकला पडला महाग
हृतिक रोशन यांच्या अडचणी थांबण्याचे नाव नाही, असेच सध्या म्हणावे लागले. त्याने केलेल्या एका टिष्ट्वटने हृतिक पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. हृतिक रोशनने आपल्या एका टिष्ट्वटमध्ये पोपच्या नावाचा उल्लेख केला होता. यामुळे महाराष्ट्र अल्पसंख्यक आयोगाचे माजी उपाध्यक्ष अब्राहम मथाई यांनी ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्याच्या आरोप करीत हृतिकला कायदेशीर नोटीस धाडले आहे. हृतिकने आपल्या टिष्ट्वटमध्ये पोप यांच्या नावाचा उल्लेख करीत कंगना रानोट हिला लक्ष्य केले होते.  ज्या महिलेसोबत माझ्या अफेअरचा दावा केला जात आहे, तिच्यापेक्षा मी पोप सोबत अफेअर करणे पसंत करेल, अशा आशयाचे टिष्ट्वट त्याने केले होते. कंगनाच्या एका वक्तव्यानंतर हृतिकने हे टिष्ट्वट केले होते. ‘मला अनेक अफवा ऐकायला येत आहे. एक्सेस(एक्स बॉयफ्रेंड) लोकप्रीयता मिळवण्यासाठी अशाप्रकारे वेड्यासारख्या गोष्टी का करतात, मला कळत नाही,’ असे कंगना म्हणाली होते. तिचा इशारा हृतिककडे होता. कंगनाच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना हृतिकने पोप संदर्भातील टिष्ट्वट केले होते. या प्रकरणावरून हृतिक व कंगना परस्परांना कायदेशीर नोटीस पाठवून चुकले आहेत.
मथाई यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले की, हृतिकला भादंविच्या कलम २९५-(अ)अंतर्गत नोटीस पाठवले आहे. सात दिवसांच्या आत जाहिर माफी मागावी अन्यथा फौजदारी तक्रार दाखल करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. आता या नोटीसनंतर हृतिक काय करतो, ते बघूयात!!

Web Title: Hrithik asks for forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.