​ ऋतिक आणि श्रीदेवीचा हा व्हीडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 15:39 IST2016-12-19T15:39:30+5:302016-12-19T15:39:52+5:30

ऋतिक रोशनच्या‘काबिल’च्या प्रदर्शनापूर्वी हृतिकच्या बालकलाकाराच्या भूमिकेतील एक गाणे सध्या व्हायरल झाले आहे. ‘भगवान दादा’ या चित्रपटात हृतिक आघाडीची नायिका श्रीदेवीसोबत नृत्य करताना दिसला होता. हा व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. या गाण्याच्या चित्रिकरणावेळी हृतिक अवघ्या १२ वर्षाचा होता.

Hrithik and Sridevi are getting this video viral | ​ ऋतिक आणि श्रीदेवीचा हा व्हीडीओ होतोय व्हायरल

​ ऋतिक आणि श्रीदेवीचा हा व्हीडीओ होतोय व्हायरल

िक रोशनच्या‘काबिल’च्या प्रदर्शनापूर्वी हृतिकच्या बालकलाकाराच्या भूमिकेतील एक गाणे सध्या व्हायरल झाले आहे. ‘भगवान दादा’ या चित्रपटात हृतिक आघाडीची नायिका श्रीदेवीसोबत नृत्य करताना दिसला होता. हा व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. या गाण्याच्या चित्रिकरणावेळी हृतिक अवघ्या १२ वर्षाचा होता. अर्थात व्हायरल झालेला हा व्हिडिओ ३० वर्षापूर्वीचा आहे. या गाण्यात हृतिकच्या पायांची हालचाल त्याच्याअंगी असणारे नृत्य बालवयातच प्रगल्ब असल्याचे सहज दिसून येते. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘भगवान दादा’ या चित्रपटात ‘चुग गई चिडिया…’ या गाण्यावर हृतिक त्यावेळीची नृत्य सम्राज्ञी श्रीदेवीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसला होता. या चित्रपटाची निर्मिती हृतिक रोशनचे आजोबा जे.ओम. प्रकाश यांनी केले होते. तर राकेश रोशन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य सुपर स्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसले होते. रजनीकांतच्या मुलाची भूमिका हृतिकने पार पाडली होती.



हृतिकच्या ‘काबिल’ या चित्रपटाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. प्रसारमाध्यमांमध्ये फिरत असलेल्या वृत्तानुसार हृतिकच्या ‘काबिल’ या चित्रपटावर कथा चोरीचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर हा आरोप नेटफ्लिक्सने लावला होता. याप्रकरणी चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहेत असे वृत्त देखील प्रसारित झाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘सारा जमाना हसीनों का दीवाना’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात उर्वशी रौतेलाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले.
चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही अनेक चर्चा रंगल्या. त्यानंतर ‘काबिल’च्या निर्मात्यांनी घोषणा केली होती की, ठरलेल्या तारखेच्या एक दिवसआधी हा चित्रपट प्रदर्शित होईल. म्हणजे येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘काबिल’ हा चित्रपट भारतात २५ जानेवारी २०१७ ला संध्याकाळी प्रदर्शित होईल आणि संध्याकाळी ६ वाजल्यापासून चित्रपटगृहात हा दाखवण्यात येईल. राकेश रोशनच्या निर्मितीत बनलेल्या या चित्रपटात हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटातून हे दोघे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.
 

Web Title: Hrithik and Sridevi are getting this video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.