'प्रत्येक विनोदावर प्रेक्षकांना हसवणं किती कठीण आहे', सनी लिओनीने शेअर केला स्टँड अप कॉमेडीचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:22 PM2021-10-19T18:22:28+5:302021-10-19T18:23:33+5:30

सनी लिओनीने स्टँड अप कॉमेडीचा अनुभव शेअर केला आहे.

'How hard it is to make the audience laugh at every joke', Sunny Leone shares her stand-up comedy experience | 'प्रत्येक विनोदावर प्रेक्षकांना हसवणं किती कठीण आहे', सनी लिओनीने शेअर केला स्टँड अप कॉमेडीचा अनुभव

'प्रत्येक विनोदावर प्रेक्षकांना हसवणं किती कठीण आहे', सनी लिओनीने शेअर केला स्टँड अप कॉमेडीचा अनुभव

googlenewsNext

'वन माइक स्टँडच्या सीजन २'च्या अधिकृत ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शोमध्ये अनेक विनोदवीर सहभागी आहेत ज्यांनी विविध बॅकग्राउंडमधल्या काही प्रतिभाशाली लोकांचे मेंटर बनले आहेत. सनी लिओनी, जी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि आता स्टँड अप कॉमेडीमध्ये आपला हात आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.  

या कार्यक्रमाविषयी आपले अनुभव शेअर करताना सनी लिओनी म्हणाली की, “मला स्टँड अप कॉमेडी आवडते आणि मी अंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काही कार्यक्रम पहिले आहेत. एखाद्या कॉमेडियनला स्टेजवर परफॉर्म करताना पाहणे खूप सोपे आणि सहज वाटते, मात्र वास्तवात दर्शकांसोबत जोडून घेणे आणि त्यांना प्रत्येक विनोदावर हसवणे किती कठीण आहे, ही एक अशी गोष्ट आहे जी मी आता खूप जवळून शिकले आहे. एक कलाकार म्हणून, मी नेहमीच नव्या गोष्टी करून पाहू इच्छिते आणि दर्शकांना आपल्या अधिकाधिक स्किल्स दाखवू इच्छिते आणि म्हणूनच जेव्हा मला 'वन माइक स्टँड २' मध्ये येण्याची संधी मिळाली तेव्हा मी ती लगेचच पटकावली."

लाइव्ह परफॉर्म करणे रोमांचक असते
ती पुढे म्हणाली की, "मी नेहमीच माझ्या चाहत्यांना आणि रसिकांना काही वेगळ्या, नव नव्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असते आणि हेच कारण आहे की या शोकडे मी लगेचच आकर्षित झाले. मी 'वन माइक स्टँड'च्या आधीच्या भागाचा भरपूर आनंद घेतला आहे. मला वाटते, हे प्रफुल्लित करणारे आहे, सेलिब्रिटी पाहुण्यांनी जे सादर केले ते अद्भुत होते, आणि त्यामुळेच त्या लेव्हलच्या तोडीस तोड देण्याचा दबाव होता. मला मोठे संवाद लक्षात ठेवणे आणि त्यांची फेक याची सवय आहे. मात्र,  लाइव्ह परफॉर्म करणे रोमांचक असते. स्टँड अप कॉमेडी एक फॅशन शो दरम्यान रॅम्पवर पडण्यापेक्षा देखील भीतीदायक असते, एखादा विनोद सांगणे आणि त्यावर कोणी हसलेच नाही तर याची मला सर्वात जास्त भीती वाटत होती. मला हे सांगायला आवडेल, मी स्वतःवर एक दोन विनोद करायला शिकले आणि आपल्या आजूबाजूच्या जगाकडे हलकेपणाने पाहायला शिकले. मला नीतिच्या सहयोगाचा आनंद आहे, ती प्रत्येक गोष्टीकडे नव्या आणि स्वाभाविक दृष्टिकोनातून पाहते. एक महिला म्हणून महिलांसोबत काम करणे नेहमीच मजेशीर असते कारण तुम्ही एकदुसऱ्याचा दृष्टिकोन आणि अनुभवांना समजता जसे दुसरे कोणी नाही समजू शकत आणि त्यामुळेच माझे सेटवरचे काम चांगले झाले आहे.” 

विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी प्रथमच स्टँड-अप कॉमेडी करणार सादर

सुप्रसिद्ध कॉमेडियन सपन वर्मा यांनी होस्ट केलेले, वन माइक स्टँड हा एक मनोरंजक आणि अनोखा शो आहे जिथे विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी प्रथमच स्टँड-अप कॉमेडी सादर करणार आहेत. प्रत्येक सेलिब्रिटीला एक स्टँड-अप कॉमेडियन नियुक्त केला जातो जो त्यांना स्टँडअप करण्यासाठी मार्गदर्शन करतो. या सीजनमध्ये अबीश मॅथ्यू, अतुल खत्री, समय रैना, सुमुखी सुरेश आणि पलटासारखे प्रतिभावान विनोदी कलाकार असून अनुक्रमे चेतन भगत, फेय डिसूझा, रफ्तार, करण जोहर आणि सनी लिओनी यांना मार्गदर्शन करणार आहेत. या सीरीजचे प्रीमियर २२ ऑक्टोबरला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर होणार आहे.

Web Title: 'How hard it is to make the audience laugh at every joke', Sunny Leone shares her stand-up comedy experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.