HOTNESS OVERLOADED: ‘चोरट्या’ एमी जॅक्सनने केला ‘न्यूड’ फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 01:30 PM2017-02-16T13:30:21+5:302017-02-16T19:08:19+5:30

फोन हॅक प्रकरणामुळे मी कोणाला दबून राहणार नाही जणू असा काही संदेश देण्यासाठी एमी जॅक्सनने एक ‘न्यूड’ फोटो शेअर केला आहे. पलंगावर पाठीमोरी नग्न बसलेली एमी या फोटोमध्ये अत्यंत रुपवान आणि प्रत्येकाच्या स्वप्नातील सौंदर्यवती दिसत आहे. पण ती वाटते तितकी निरागस नाही. तिने एक गुन्हा केलेला आहे.

HOTNESS OVERLOADED: 'Stealth' Amy Jackson made 'Nude' photo share | HOTNESS OVERLOADED: ‘चोरट्या’ एमी जॅक्सनने केला ‘न्यूड’ फोटो शेअर

HOTNESS OVERLOADED: ‘चोरट्या’ एमी जॅक्सनने केला ‘न्यूड’ फोटो शेअर

googlenewsNext
ी जॅक्सनचा फोन हॅक झाल्यामुळे सध्या ती प्रचंड तणावाखाली असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे काहीच नाही हे आम्ही तुम्हाला सांगतो. तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक करून हॅकरला असे वाटले असे की, ती घाबरून जाईल. पण त्याच्या मनसुब्यावर एमीने पाणी फेरले.

फोन हॅक प्रकरणामुळे मी कोणाला दबून राहणार नाही जणू असा संदेश देण्यासाठी तिने एक ‘न्यूड’ फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पलंगावर पाठीमोरी नग्न बसलेली एमी या फोटोमध्ये अत्यंत रुपवान आणि प्रत्येकाच्या स्वप्नातील सौंदर्यवती दिसत आहे. पण ती वाटते तितकी निरागस नाही. तिने एक गुन्हा केलेला आहे.
 

या टॉपलेस फोटोखाली तिने हातामध्ये असणाऱ्या गुलाबाची हकीकत सांगितली. ‘हॉटेलच्या लॉबीमधून मी हे गुलाबाचे फुल चोरलेले आहे,’ असे तिने लिहिले. एमीला असे पुन्हा एकदा दिलखुलास पाहून  तिच्या चाहत्यांना नक्कीच बरे वाटले असणार. कारण फोन हॅक झाल्यामुळे तिला जबर धक्का बसला होता.

ती म्हणाली होती की, ‘माझ फोन हॅक झाल्याचे जेव्हा मला कळाले तेव्हा खूप मोठा धक्का बसला. ही गोष्टी साधीसुधी नव्हती. दुर्लक्ष करण्याजोगी तर मुळीच नव्हती. मी लंडनमध्ये हॅकरविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविणार असून त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार. सायबर सुरक्षा हा आजच्या काळातील अत्यंत कळीचा मुद्दा बनत चाललेला आहे.’

एमी सध्या रजनीकांतसोबत ‘२.०’मध्ये काम करीत असून त्यामध्ये अक्षय कुमार मुख्य खलनायकाची भूमिका साकारतोय. फोनमध्ये काही तरी बिघाड झाला म्हणून ती लंडनमध्ये मोबाईलच्या दुकानात गेली होती. परंतु भारतात परतल्यावरच तिला कळाले की, तिचा फोन हॅक झाला. त्यानंतर ती चेन्नईला गेली. मग सोशल मीडियावर तिच्या फोनमधील वैयक्तिक फोटो फिरू लागल्याचे तिला लक्षात आले.

ALSO READ: ​एमी जॅक्सनचा मोबाइल हॅक; लीक केले पर्सनल फोटोज्

Web Title: HOTNESS OVERLOADED: 'Stealth' Amy Jackson made 'Nude' photo share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.