HOT & SEXY DEEPIKA PADUKONE: लॉस एंजिलिस येथील xXx प्रीमियरमध्ये दीपिका पदुकोणची सेक्सी अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 13:55 IST2017-01-23T08:25:28+5:302017-01-23T13:55:28+5:30

दीपिका पदुकोण सध्या जगभर तिचा हॉलीवूड डेब्यू सिनेमा ‘xXx : रिटर्न आॅफ द झेंडर केज’च्या प्रचारार्थ फिरत आहे. नुकतेच ...

HOT & SEXY DEEPIKA PADUKONE: Deepika Padukone's Sexy Paid at xXx premiere at Los Angeles | HOT & SEXY DEEPIKA PADUKONE: लॉस एंजिलिस येथील xXx प्रीमियरमध्ये दीपिका पदुकोणची सेक्सी अदा

HOT & SEXY DEEPIKA PADUKONE: लॉस एंजिलिस येथील xXx प्रीमियरमध्ये दीपिका पदुकोणची सेक्सी अदा

पिका पदुकोण सध्या जगभर तिचा हॉलीवूड डेब्यू सिनेमा ‘xXx : रिटर्न आॅफ द झेंडर केज’च्या प्रचारार्थ फिरत आहे. नुकतेच मनोरंजन विश्वाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉस एंजिलिस शहरात या सिनेमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी सर्व प्रमुख कलाकारांसोबतच दीपिका पदुकोणसुद्धा उपस्थित होती. 

                             Deepika at LA

यावेळी तिने पुन्हा एकदा सिद्ध केले की, ती रेड कार्पेट क्वीन का आहे. तिने परिधान केलेल्या कस्टम-मेड राल्फ लॉरेन गाऊनमध्ये तिचे सौंदर्य असे काही खुलून दिसत होते की, सर्वजण पाहतच राहिले.

                             Deepika at LA1

सर्व मीडिया फोटोग्राफर्स तिची एकूण एक अदा आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी धडपड करीत होते. हॉलीवूडमध्ये नवखी असूनही तिला मिळत असलेला प्रतिसाद पाहता दीपिकाने अमेरिका जिंकली असेच म्हणावे लागेल.

                             Deepika at LA2

गुलाबी रंगाचा हा गाऊन तिच्या त्वचेच्या टोनशी एकमद जुळत होता. सोबत पातळ अशी पोनी टेल आणि  कानातील डार्क रेड रंगाच्याआकर्षक रिंग्समुळे तर लावाण्यवती दीपिका या प्रीमियर सोहळ्याची केंद्रबिंदू ठरली.

                            Deepika at LA4

मुंबईतील प्रीमियरमधील गोल्डन गाऊन व लंडन प्रीमियरमधील लाल रंगाच्या गाऊननंतर लॉस एंजिलिसच्या प्रीमियरमधील तिची ड्रेसची निवड पाहता दीपिकाचा फॅशन सेन्सला काही तोडच नाही असे दिसतेय. मुंबईत घातलेल्या ड्रेसमध्ये ती जरा ‘अनकम्फर्टेबल’ वाटत होती मात्र ‘एलए’मध्ये तिला असा प्रॉब्लेम जाणवला नाही.

                            Deepika at LA5

फोटोग्राफर्सना पोझ देण्याबरोबरच चाहत्यांना आॅटोग्राफ्स देऊन तिने खुश केले. रेड कार्पेटवरील तिचा आत्मविश्वासाने भरलेला वावर पाहून तुम्हीदेखील हैराण होऊन जाल. 

                           Deepika at LA 6

चित्रपटातील सहकलाकार अ‍ॅड्रियाना ग्युटिएरेझसोबत तिने अशी खोडकर पोझ दिली.

Web Title: HOT & SEXY DEEPIKA PADUKONE: Deepika Padukone's Sexy Paid at xXx premiere at Los Angeles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.