​‘रात बाकी’मध्ये दिसणार कॅट-फवादची ‘हॉट केमिस्ट्री’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 21:23 IST2016-08-22T15:53:39+5:302016-08-22T21:23:39+5:30

कॅटरिना कैफ आणि फवाद खान ही ‘हॉट’ जोडी पडद्यावर किती ‘हॉट’ दिसेल, केवळ कल्पना करा... कदाचित याचमुळे या जोडीला ...

'Hot Chemistry' to appear in 'Night Balance'? | ​‘रात बाकी’मध्ये दिसणार कॅट-फवादची ‘हॉट केमिस्ट्री’?

​‘रात बाकी’मध्ये दिसणार कॅट-फवादची ‘हॉट केमिस्ट्री’?

टरिना कैफ आणि फवाद खान ही ‘हॉट’ जोडी पडद्यावर किती ‘हॉट’ दिसेल, केवळ कल्पना करा... कदाचित याचमुळे या जोडीला पडद्यावर आणण्याची तयारी धर्मा प्रॉडक्शनने सुरु केली आहे. फवाद खान आणि कॅटरिना कैफ या दोघांनी करण जोहरचा एक चित्रपट साईन केल्याची बातमी आहे. करण स्वत: हा चित्रपट दिग्दर्शित करणार नसून दिग्दर्शक, गीतकार,संवाद लेखक, गायक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरणारा आदित्य धर ही जबाबदारी पार पाडणार असल्याची खबर आहे. आता या चित्रपटाचे नाव काय?? तर आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार, तूर्तास ‘रात बाकी’ असेया चित्रपटाचे  तात्पुरते नामकरण करण्यात आले आहे. ‘रात बाकी’ ही  एक म्युझिकल लव्ह स्टोरी असेल. आदित्य धर स्वत: गीतकार असल्याने त्याने या चित्रपटाच्या कंपोझिशनवर काम सुरु केले आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे. आता प्रतीक्षा आहे ती केवळ औपचारिक घोषणेची. ती कधी होते, ते बघू!!

Web Title: 'Hot Chemistry' to appear in 'Night Balance'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.