Disha Patani David Warner Dance: दिशा पटानीसोबत क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचा भन्नाट डान्स? तुम्ही पाहिलात का व्हिडीओ? (Video)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 03:58 PM2022-04-07T15:58:10+5:302022-04-07T15:58:49+5:30

डेव्हिड वॉर्नरच्या या डान्स व्हिडीओला १.७० मिलियन व्ह्यूज आहेत.

Hot Bollywood Actress Disha Patani dancing with Australian Cricketer David Warner Video goes viral see what exactly happened | Disha Patani David Warner Dance: दिशा पटानीसोबत क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचा भन्नाट डान्स? तुम्ही पाहिलात का व्हिडीओ? (Video)

Disha Patani David Warner Dance: दिशा पटानीसोबत क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचा भन्नाट डान्स? तुम्ही पाहिलात का व्हिडीओ? (Video)

googlenewsNext

Disha Patani David Warner Dance Video: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा भारतीय चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. त्याच्या फलंदाजीमुळे तो ओळखला जातो. पण त्यासोबतच तो आपल्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या हटके व्हिडीओंमुळेही चर्चेत असतो. बॉलिवूड चित्रपटांवरील प्रेम डेव्हिड वॉर्नरने वेळोवेळी जाहीर केले आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि सिनेमे यांच्याही तो फार मोठा चाहता आहे. सध्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबतचा त्याचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ चर्चेत आहे. नक्की काय आहे तो व्हिडीओ पाहूया.

डेव्हिड वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो दिशा पटानी सोबत सिटी मार या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. अनेकांना असं वाटलं की वॉर्नर आणि दिशा यांनी खरोखर एकमेकांसोबत डान्स केला. पण खरी कहाणी वेगळीच आहे. डेव्हिड वॉर्नरने एका अँपच्या मदतीने बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याच्या चेहऱ्याच्या जागी स्वत:चा चेहरा लावला आहे आणि तसा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने विचारलं देखील आहे की, मी हा डान्स ट्राय करू का? वॉर्नरच्या या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर इतके वर्ष हैदराबादच्या संघाकडून खेळल्यानंतर यंदा दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला आहे. गेल्या महिन्यात वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानात होता. तेथून मालिका संपवून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात आले. ६ एप्रिलपासून बहुतांश ऑस्ट्रेलियन खेळाडू संघनिवडीसाठी उपलब्ध झाले आहेत. वॉर्नरदेखील लवकरच दिल्लीच्या संघातून खेळताना दिसणार आहे.

Web Title: Hot Bollywood Actress Disha Patani dancing with Australian Cricketer David Warner Video goes viral see what exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.