Horrible!! ‘या’ अभिनेत्रीचे रस्त्यावरच्या कुत्र्यांनी तोडले अक्षरश: लचके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 16:55 IST2017-01-25T11:24:11+5:302017-01-25T16:55:46+5:30
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रीय अभिनेत्री पारूल यादव सध्या मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात भरती आहे. बुधवारी अंधेरी येथील तिच्या अपार्टमेंटबाहेर पारूलवर ...

Horrible!! ‘या’ अभिनेत्रीचे रस्त्यावरच्या कुत्र्यांनी तोडले अक्षरश: लचके!
स ऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रीय अभिनेत्री पारूल यादव सध्या मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात भरती आहे. बुधवारी अंधेरी येथील तिच्या अपार्टमेंटबाहेर पारूलवर चार पाच बेवारस कुत्र्यांनी हल्ला केला. पारूल आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन बिल्डिंगबाहेर फेरफटका मारत असताना काही बेवारस कुत्री तिच्या पाळीव कुत्र्यावर तुटून पडली. आपल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात या कुत्र्यांनी अचानक पारूलला घेरले. कुत्र्यांनी पारूलच्या शरिराचे अक्षरश: लचके तोडले. या हल्ल्यात पारूलचे हात, गळा, पाय, चेहरा अशा अनेक शरिराच्या अंगावर गंभीर जखमा झाल्यात. तिच्या डोक्यावरही ३ सेमी. खोल जखम झाली आहे. गत सोमवारी ही घटना घडली.
![]()
या हल्ल्यानंतर पारूलला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पारूलची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. मात्र जखमा खोल असल्याने पारूलवर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे.
![]()
कंगना राणौतचा प्रचंड गाजलेल्या ‘क्चीन’ या चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये पारूल दिसणार आहे. अलीकडे तिने हा चित्रपट साईन केलायं. पारूल यादव हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. अनेक कन्नड, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्ये तिने काम केलेय. मॉडेलिंगनंतर पारूलने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘भाग्यविधाता’, ‘कॉमेडी का महामुकाबला’,‘डर सबको लगता है’ अशा हिंदी मालिकांमध्येही पारूल झळकली आहे.
२००४ मध्ये ‘ड्रिम्स’ या तामिळ चित्रपटाद्वारे पारूलने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटात ती अभिनेता धनुषसोबत दिसली. यानंतर २०११ मध्ये ‘गोविदाय नम:’ या कन्नड चित्रपटात झळकली. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. एकीकडे तामिळ, कन्नड अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत असताना पारूल छोट्या पडद्यावरही दिसली. २००९ मध्ये ‘भाग्यविधाता’ या हिंदी मालिकेतून पारूलने छोट्या पडद्यावर डेब्यू केला.