‘लाल रंग’ मध्ये हुडा बनला ‘ब्लड माफिआ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 09:11 IST2016-03-31T16:11:10+5:302016-03-31T09:11:10+5:30

रणदीप हुडा सध्या बॉलीवूडमध्ये एकाच चित्रपटामुळे चर्चेत आहे तो म्हणजे ‘सरबजीत’.

Hooda in 'Red Color' becomes 'blood mafia' | ‘लाल रंग’ मध्ये हुडा बनला ‘ब्लड माफिआ’

‘लाल रंग’ मध्ये हुडा बनला ‘ब्लड माफिआ’

रणदीप हुडा सध्या बॉलीवूडमध्ये एकाच चित्रपटामुळे चर्चेत आहे तो म्हणजे ‘सरबजीत’. त्याला बॉलीवूडमध्ये येऊन केवळ एक-दोन वर्ष झाली असतील पण त्याने चार ते पाच चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. तो आता ‘लाल रंग’ या चित्रपटात दिसणार असून त्याचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे.

रणदीपचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आवर्जुन वाट पाहत आहेत. तसेच हरयाणाच्या ब्लड माफिआची भूमिका तो कशी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तो शंकरची भूमिका करतो आहे. रक्त पुरवण्याचे कामच तो महत्त्वाचे मानत असतो. आणि अत्यंत प्रमाणिकपणे करत असतो.

या चित्रपटातून अक्षय ओबेरॉय देखील कमबॅक करत आहे. त्यानेही काही बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच राजनीश दुग्गल याने पोलिस अधिकाºयाची भूमिका केली आहे.
 

Web Title: Hooda in 'Red Color' becomes 'blood mafia'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.