​‘लाईमलाईट’मध्ये नसूनही हनी सिंह हाच सोशल मीडियाचा ‘बादशाह’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 11:24 IST2017-09-21T05:54:39+5:302017-09-21T11:24:39+5:30

भारतात हिप-हॉप म्युझिकचे नाव घेताच, सर्वप्रथम आपल्या ओठांवर येते ते यो यो हनी सिंहचे नाव. हाई हिल्स, लुंगी डान्स, ...

Honey Singh is not the 'Limelite' but the 'Badshah' of social media! | ​‘लाईमलाईट’मध्ये नसूनही हनी सिंह हाच सोशल मीडियाचा ‘बादशाह’!

​‘लाईमलाईट’मध्ये नसूनही हनी सिंह हाच सोशल मीडियाचा ‘बादशाह’!

रतात हिप-हॉप म्युझिकचे नाव घेताच, सर्वप्रथम आपल्या ओठांवर येते ते यो यो हनी सिंहचे नाव. हाई हिल्स, लुंगी डान्स, देसी कलाकार अशा लोकप्रीय गाण्यांसाठी ओळखला जाणारा हा गायक आणि रॅपर सध्या बॉलिवूडमध्ये फार सक्रीय नाही. गेल्या दोन वर्षांत हनीचे एकही गाणे रिलीज झालेले नाही. पण तरिही त्याची क्रेझ जराही कमी झालेली नाही, असेच म्हणावे लागेल. होय, हनीने Twitterवर ४० लाख फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. फेसबुकवर त्याचे ३ लाखांवर फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, दोन वर्षांपासून  ‘अज्ञातवासात’ असूनही  हनीच्या प्रशंसकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. खरे तर सध्या बॉलिवूडमध्ये रॅपर बादशाहच्या गाण्यांचा बोलबाला आहे. पण लोकप्रीयतेच्या बाबतीत म्हणाल तर हनीचं अव्वल आहे. twitterवर बादशाहचे केवळ १७.६ लाख फॉलोअर्स आहेत. याऊलट हनीने ४० लाखांचा टप्पा गाठला आहे.



‘धीरे धीरे से...’ या ब्लॉकबस्टर गाण्यानंतर चाहते हनीच्या वापसीची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तो ‘राईज अ‍ॅण्ड शाईन’ या आपल्या नव्या अल्बमच्या तयारीत बिझी आहे. 

ALSO READ : जाणून घ्या, ‘या’ सेलिब्रिटींना व्यसनांमुळे झाला मनस्ताप

हनी सिंह गेल्या गत काळात वादात सापडला होता. गत काळात सुमारे दीड वर्षे योयो बॉलिवूडमधून पुरता गायब झाला होता. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत याकाळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते.  बॉलिवूडमधून काही काळ  मी  गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती.  यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबुल केले होते.  बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनीसिंह मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते.  

Web Title: Honey Singh is not the 'Limelite' but the 'Badshah' of social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.