Holi Special : ‘हा’ खास फोटो शेअर करून प्रियांका चोपडाने दिल्या होळीच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 17:37 IST2017-03-13T12:05:04+5:302017-03-13T17:37:08+5:30

​आज संपूर्ण देशात ‘होळी’ हा सण उत्साहात साजरा केला जात असून, सर्वसामान्यांसह सेलिब्रेटीदेखील होळीच्या रंगात रंगलेले असल्याचे बघावयास मिळत आहेत.

Holi Special: Priyanka Chopra wishes to share the special photo of 'Holi'! | Holi Special : ‘हा’ खास फोटो शेअर करून प्रियांका चोपडाने दिल्या होळीच्या शुभेच्छा!

Holi Special : ‘हा’ खास फोटो शेअर करून प्रियांका चोपडाने दिल्या होळीच्या शुभेच्छा!

संपूर्ण देशात ‘होळी’ हा सण उत्साहात साजरा केला जात असून, सर्वसामान्यांसह सेलिब्रेटीदेखील होळीच्या रंगात रंगलेले असल्याचे बघावयास मिळत आहेत. अशात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोपडा हिनेही सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करीत तिच्या फॅन्सला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करताना लिहिले की, ‘डू मी ए फेवर लेट्स प्ले होली’ यावेळी प्रियांका फोटोमध्ये रंगाने रंगलेली बघावयास मिळत असून, तिचा हा शुभेच्छा देण्याचा अंदाज तिच्या फॅन्सना नक्कीच आवडला असेल. सध्या प्रियंका तिच्या अमेरिकी टीव्ही शो क्वांटिकोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिला भारतात होळी सेलिब्रेट करता आली नाही. 
 

अशात तिने आपली परंपरा अन् संस्कृती जोपासत विदेशात राहूनही होळी उत्सवाचा आनंद घेतल्याचे फोटोवरून स्पष्टपणे दिसत आहे. शिवाय तिने तिच्या भावना फॅन्सबरोबरही शेअर केल्या आहेत. प्रियंकाच्या या शुभेच्छांना पाच तासांतच साडेतीन हजारांपेक्षा अधिक कमेण्ट करीत फॅन्सनेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सध्या प्रियंका तिच्या क्वांटिको या टीव्ही शोबरोबरच आगामी ‘बेवॉच’ या सिनेमामुळेही चर्चेत आहे. सध्या प्रमोशननिमित्त विविध देशांमध्ये जात असल्याने ती सातत्याने चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ड्वेन जॉन्सन ऊर्फ द रॉक भारतात येणार असल्याची चर्चा आहे. कारण दीपिका पादुकोन हिची भूमिका असलेल्या ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विन डिजेल भारतात आला होता. आता प्रियंका द रॉकला भारतात आणून दीपिकावर कुरघोडी करणार काय? अशी चर्चा रंगलेली आहे. 

Web Title: Holi Special: Priyanka Chopra wishes to share the special photo of 'Holi'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.