गाण्यात 'हिट' पण अभिनय क्षेत्रात ठरले फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 13:38 IST2017-07-26T07:16:37+5:302017-07-26T13:38:21+5:30

बॉलिवूडमध्ये येऊन हिरो बनण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. लाखो तरुण हे स्वप्न उराशी बाळगून मुबंईत येतात. बॉलिवूडमधल्या काही सिंगर्सनाही अभिनायाची ...

'Hit' in singing but the flops were not in the acting area | गाण्यात 'हिट' पण अभिनय क्षेत्रात ठरले फ्लॉप

गाण्यात 'हिट' पण अभिनय क्षेत्रात ठरले फ्लॉप

लिवूडमध्ये येऊन हिरो बनण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. लाखो तरुण हे स्वप्न उराशी बाळगून मुबंईत येतात. बॉलिवूडमधल्या काही सिंगर्सनाही अभिनायाची भुरळ पडली. गाण्याबरोबर त्यांनी अभिनय क्षेत्रात ही रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना फारसे यश हाती लागले नाही. एक नजर टाकुया अशाच काही सिंगर्स कम स्टार्सवर.  

सोनू निगम
सोनू निगम 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'परदेस' चित्रपटातील 'ये दिल दिवाना' या गाण्यांना त्याला घराघरात पोहोचला. बॉलिवूडच्या आघाडीच्या गायकांमध्ये त्याचे नाव सामील आहे. गाण्यात नाव झाल्यानंतर त्याला अभिनय क्षेत्र खूणावू लागले. त्यांने "जानी दुश्मन, लव्ह इन नेपाल, काश आप हमारे होते"  या चित्रपटात अभिनय केला. मात्र अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी त्याला नकारले.  



२. अभिजीत सावंत
पहिला इंडियन आयडॉल बनलेल्या अभिजित सावंतला लोकांनी भरभरुन प्रेम दिले. सोनू प्रमाणे त्यांने ही 2008मध्ये लॉटरी या चित्रपटात नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला पण तो ही अयशस्वी ठरला. 



३. आदित्य नारायण 
प्रसिद्ध गायक उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायण यांने २०१० मध्ये  विक्रम भट्ट दिग्दर्शित "शापित" ह्या चित्रपटातून अॅक्टिंगमध्ये पदार्पण केले. पण प्रेक्षकांनी त्याला अभिनेता म्हणून स्वीकारले नाही. नंतर आदित्यने ही लवकरच अॅक्टिंगचा नाद सोडला.


४. हिमेश रेशमिया 
हिमेश रेशमिया शिवाय तर ही यादी पूर्ण होऊ शकत नाही,  संगीतकार दिग्दर्शक आणि सिंगर्स म्हणून प्रसिद्ध असलेला हिमेशने सुद्धा अभिनयात आपले नाणे वाजवण्यात प्रयत्न केला. पण त्याचे "कर्ज, आपका सुरुर , रेडिओ, काजरारे, खिलाडी 786" या सारखे लागोपाठ आलेले चित्रपट फ्लॉप ठरले. 


५. मिका सिंग
 पॉप गायक आणि रॅपर म्हणून मिका सिंग हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. सिंग इज किंग आणि जब वी मेट मध्ये गायलेल्या भांगड्यामुळे तो प्रसिद्ध झोतात आला.  २०१० मध्ये आलेल्या पंजाबी चित्रपट 'मिट्टी' आणि 'बालविंदर सिंग फेमस हो गया' काम केले मात्र दोन्ही चित्रपट साफ आपटले.   

Web Title: 'Hit' in singing but the flops were not in the acting area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.