सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे मुंबईत निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:09 AM2018-10-13T10:09:58+5:302018-10-13T13:22:28+5:30

शनिवार रात्री 3 वाजून 51 मिनिटांनी गायिका अन्नपूर्णा देवी यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी या 92 वर्षांच्या होत्या.

Hindustani classical musician Annapurna Devi passes away | सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे मुंबईत निधन

सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे मुंबईत निधन

googlenewsNext

शास्त्रीय संगीतातील नामवंत सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे नुकतेच निधन झाले. शनिवार रात्री 3 वाजून 51 मिनिटांनी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अन्नपूर्णा देवी या 92 वर्षांच्या होत्या. वाढत्या वयामुळे त्यांना अनेक आजारांनी ग्रासलेले होते. त्या गेल्या कित्येक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्या सतार वादनाचे अनेक चाहते असून त्यांना त्यांच्या त्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पद्मभुषण हा पुरस्कार देखील मिळाला होता.

अन्नपूर्णा देवी या मुळच्या मध्य प्रदेशच्या होत्या. मध्य प्रदेशच्या मयहार या गावात त्यांचा 1927 ला जन्म झाला. चार भावंडांमध्ये त्या सगळ्यात लहान होत्या. त्यांना त्यांच्या घरातच संगीताचा वारसा लाभला. त्यांचे वडील उस्ताद अल्लाऊदीन खान हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होते. सेनिया मयहार या गायन घराण्याशी त्यांचा संबंध होता. त्यांच्याकडूनच खूपच लहान वयात अन्नपूर्णा यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. 

अन्नपूर्णा देवी यांचे लग्न संगीत क्षेत्रातील दिग्गज पंडित रवी शंकर यांच्यासोबत झाले होते. त्यांना शुभेंद्र शंकर हा मुलगा होता. पण त्याचे निधन 1992 मध्ये झाले. पंडित रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी 21 वर्षं संसार केला आणि त्यानंतर ते विभक्त झाले. रवी शंकर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी ऋषी कुमार पांड्या यांच्यासोबत लग्न केले. ऋषी कुमार पांड्या हे मॅनेजमेंट कन्सलटंट होते. त्यांचे निधन 2013 मध्ये झाले.
 
अन्नपूर्णा देवी यांनी अनेकांना गायनाचे धडे दिले. आशिष खान (सरोद), अमित भट्टाचार्य (सरोद), बहाद्दूर खान (सरोद), बसंत काबरा (सरोद) हरिप्रसाद चौरसिया (बासरी) यांसारखे संगीत क्षेतातील दिग्गज हे अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य होते.  

Web Title: Hindustani classical musician Annapurna Devi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.