​‘साहो’साठी प्रभास शिकणार हिंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 14:40 IST2017-05-22T09:10:55+5:302017-05-22T14:40:55+5:30

‘बाहुबली’ प्रभास सध्या अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करतो आहे. महिनाभर सुट्टी एन्जॉय केल्यानंतर प्रभास ‘साहो’ या त्याच्या आगामी चित्रपटात बिझी ...

Hindi will learn Prabhas for 'Saoho' | ​‘साहो’साठी प्रभास शिकणार हिंदी!

​‘साहो’साठी प्रभास शिकणार हिंदी!

ाहुबली’ प्रभास सध्या अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करतो आहे. महिनाभर सुट्टी एन्जॉय केल्यानंतर प्रभास ‘साहो’ या त्याच्या आगामी चित्रपटात बिझी होणार आहे. याच चित्रपटाशी संबंधित एक ताजी खबर आमच्याकडे आहे. होय, हा अ‍ॅक्शनपट तेलगू आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे.‘बाहुबली2’ हा चित्रपट हिंदीत डब केला गेला. पण ‘साहो’ एकाच वेळी हिंदी आणि तेलगू अशा दोन भाषांत तयार होणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी प्रभास हिंदी शिकणार आहे.
‘बाहुबली2’मध्ये प्रभासचे हिंदीतील संवाद अभिनेता शरद केळकर याच्या आवाजात डब केले गेले होते. पण आता ‘साहो’मध्ये प्रभास आपले हिंदीतील संवाद स्वत: बोलणार आहे. त्यापूर्वी प्रभासला हिंदी शिकावी लागणार आहे. जुलैमध्ये ‘साहो’चे फर्स्ट शेड्यूल सुरु होण्यापूर्वी प्रभास हिंदीची शिकवणी लावणार आहे. 

ALSO READ :  ‘साहो’मध्येही ‘देवसेना’! पुन्हा रंगणार प्रभास व अनुष्का शेट्टीचा रोमान्स!

‘साहो’मध्ये प्रभासची हिरोईन कोण असणार, हे अद्याप ठरलेले नाही. आधी या चित्रपटात कॅटरिना कैफ दिसणार अशी खबर आली. मग पूजा हेगडे, श्रद्धा कपूर या दोघींची नावे चर्चेत आलीत आणि आता अनुष्का शेट्टी प्रभासच्या अपोझिट दिसणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात प्रभास दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या अ‍ॅक्शन सीन्ससाठी जगभरातील मोठ मोठे अ‍ॅक्शन कोरिओग्राफरची मदत घेतली जाणार आहे. वम्सी आणि प्रमोद निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत करणार आहे. ‘बाहुबली2’सोबत या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला होता. या टीजरला प्रेक्षकांचा अद्भूत प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच प्रेक्षकांना ‘साहो’ची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. अर्थात या चित्रपटासाठी आपल्याला पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Hindi will learn Prabhas for 'Saoho'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.