हिना खानही निघाली बॉलिवूडला! साईन केला चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 15:13 IST2018-11-26T15:11:14+5:302018-11-26T15:13:42+5:30
होय, लवकरच हिना एका चित्रपटात दिसणार आहे. हिनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे तिने सांगितले.

हिना खानही निघाली बॉलिवूडला! साईन केला चित्रपट!!
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे अक्षराच्या रुपात घराघरांत पोहोचलेली हिना खान आता स्टायलिश व्हॅम्प बनून छोट्या पडद्यावर परतली आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये हिना खान कोमोलिकाची भूमिका साकारते आहे.
हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहु’ म्हणून अधिक ओळखतात. आपली ही ओळख पुसण्यासाठी हिनाने जीवाचा बराच आटापीटा केला. साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ‘ये रिश्ता....’ मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली. मालिकेनंतर ती रिअॅलिटी शोमध्ये झळकली. ‘बिग बॉस 11’ आणि ‘खतरों के खिलाडी सिझन 8’ मध्येही सहभागी झाली. त्यानंतर आता ती ‘कसौटी जिंदगी की 2’ मालिकेत कोमोलिका भूमिका साकारत आहे.
आता तर हिना थेट बॉलिवूडला निघाली आहे. होय, लवकरच हिना एका चित्रपटात दिसणार आहे. हिनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे तिने सांगितले. शिवाय बॉलिवूडमध्ये संधी मिळाल्याने प्रचंड उत्सूक असल्याचेही सांगितले. यात ती एका स्वतंत्र बाण्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील काश्मिरवर आधारित आहे. हुसैन खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा राहत काजमी आणि शक्ती सिंह यांनी लिहिलीय.
या चित्रपटामुळेच हिना सध्या ‘कसौटी जिंदगी की 2’मधून गायब आहे. ‘कसौटी जिंदगी की 2’आधीच हिनाने हा चित्रपट साईन केला होता. हे शूटींग पूर्ण झाल्यानंतर हिना नव्याने ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये कमोलिका बनून परतणार आहे.