‘हिच्या’साठी हिमेशने मोडला २२ वर्षांचा संसार ! कोणाशी आहे हिमेशचे ‘एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेयर’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 12:35 IST2016-12-09T12:21:15+5:302016-12-09T12:35:56+5:30
संगीतकार-अभिनेता हिमेश रेशमियाने पत्नी कोमलसोबत असलेला २२ वर्षांचे लग्न मोडत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. ७) बँड्रा ...

‘हिच्या’साठी हिमेशने मोडला २२ वर्षांचा संसार ! कोणाशी आहे हिमेशचे ‘एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेयर’?
स गीतकार-अभिनेता हिमेश रेशमियाने पत्नी कोमलसोबत असलेला २२ वर्षांचे लग्न मोडत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. ७) बँड्रा फॅ मिली कोर्टात दोघांनी घटस्फोटाचे पेपर दाखल केले असून त्यांच्या नात्यामध्ये ‘कोणी तरी तिसरी’ आल्यामुळे हा दुरावा आल्याची चर्चा आहे.
दहा वर्षांपासून हिमेशचे टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरशी नाव जोडले जातेय. विशेष म्हणजे गेले काही महिने हिमेश आणि कोमल वेगळे राहत असून तिला सोनियासोबत असलेले त्याचे अफेयर माहित होते आणि तिची काही हरकतसुद्धा नव्हती. अखेर दोघांनी नात्याला कायदेशीर विराम देण्याचे ठरवले आणि त्यानुसार घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.
म्युच्युअल रिस्पेक्ट
याबाबत जाहीर केलेल्या निवेदनात हिमेशने म्हटले की, ‘पती-पत्नीमध्ये ऐकमेकांविषयी आदर असणे अत्यंत महत्त्वाचे असते. एवढ्या वर्षांच्या नात्याचा मान राखत आम्ही सौहार्दपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कुटुंबियांना हा निर्णय मान्य आहे. घटस्फोटानंतरही कोमल माझ्या परिवाराचा एक महत्त्वपूर्ण भाग राहील.’
![]()
सोनिया जबाबदार नाही
कोमलनेदेखील अशाच सुरात स्टेटमेंट देत ‘हिमेशच्या विवाहबाह्य संबंधा’चे खंडन केले. ती म्हणाली की, ‘वेगळे होण्याचा निर्णय आमच्या दोघांचा आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणालाही जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही. ऐकमेकांच्या अनुरूप नात्याचे बंध न राहिल्यामुळे आमचा संसार मोडला. सोनिया त्यासाठी कारणीभूत नाही. कौटुंबिक सदस्याप्रमाणे आम्ही तिला प्रेम करतो.’
पती, पत्नी और ‘वो’
सर्वप्रथम २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिले चार वर्षे तर हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच सांगितली. परंतु दोघांची वाढती सलगी मीडियापासून लपून राहिली नाही. कुटुंबियांच्या विरोधामुळे मग काही काळासाठी दोघांनी एकमेकांपासून अंतर राखून ठेवले. परंतु हिमेशच्या वडीलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. सुत्रांनुसार, कोमलला याची पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही.
![]()
मुलाची कस्टडी
हिमेश आणि कोमलला स्वयम नावाचा किशोरवयीन मुलगा आहे. घटस्फोटानंतर दोघांनी त्याचे सहपालकत्व स्वीकारण्याचे ठरवले आहे. हिमेश मुलाच्या खूप जवळ असून त्याच्यावर घटस्फोटामुळे नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून तो आणि कोमल एकाच इमारतीमध्ये राहणार आहेत.
cnxoldfiles/a> अशा अनेक सिनेस्टार्सचे संसार मोडले आणि आता त्यामध्ये हिमेशचे नावही जोडले जाणार.