२०२४ मध्ये कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात? अभिनेत्रीनं स्पष्टच सांगितलं अन् AAP बाबतही केली भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 04:19 PM2022-10-29T16:19:36+5:302022-10-29T16:21:06+5:30

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

himachal pradesh assembly election kangana ranaut says she is willing to fight elections | २०२४ मध्ये कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात? अभिनेत्रीनं स्पष्टच सांगितलं अन् AAP बाबतही केली भविष्यवाणी!

२०२४ मध्ये कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात? अभिनेत्रीनं स्पष्टच सांगितलं अन् AAP बाबतही केली भविष्यवाणी!

googlenewsNext

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जनतेची इच्छा असेल आणि भाजपने तिकीट दिल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं ती म्हणाली आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगनाने ही इच्छा व्यक्त केली. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांना 'महापुरूष' असं संबोधलं. 

कंगना म्हणतेय, भविष्यवाणी खरी ठरली; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर पराग अग्रवाल यांना झटका

"मोदींना राहुल गांधींसारख्या नेत्याला तोंड द्यावं लागत आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे. तर राहुल गांधींसाठी दु:खद गोष्ट अशी आहे की त्यांचा सामना स्वत:शीच आहे. मोदीजींनाही माहित आहे की त्यांचा कुणीच विरोधक नाही. ते स्वतः नेहमी पुढे जाण्याच्या वृत्तीनं काम करत राहतात. राहुल गांधी त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत", असं कंगना म्हणाली. 

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीवर बोलताना कंगनानवर आम आदमी पक्षावर निशाणा साधला. "हिमाचल प्रदेश आम आदमी पक्षाच्या (आप) खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही. हिमाचलमध्ये लोकांनी स्वतःची सौर उर्जा विकसीत केली आहे आणि लोक स्वतःच भाज्या पिकवतात. हिमाचलमध्ये तुम्हाला मोफत घोषणांचा फायदा होणार नाही. हिमाचलच्या लोकांना फुकट काहीही नको आहे", असं कंगना म्हणाली. 

लोक बॉलिवूडबद्दल जागरूक झाले: कंगना
राजकारणात आणखी लोकांनी पुढे यावे अशी माझी इच्छा आहे, असंही कंगना म्हणाली. दुसरीकडे, पुन्हा एकदा बॉलीवूडवर निशाणा साधताना कंगनानं बॉलीवूडमध्ये घराणेशाही संपू शकत नाही असा आरोप केला. पण आता प्रेक्षक जागरूक झाले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. लोक आता बदलले आहेत, आता हे सर्व चालणार नाही, असे ते सांगत आहेत. तुम्ही चांगला काम दाखवा. तरच आम्ही चित्रपट पाहू. आता स्टार संस्कृतीही नष्ट होत असल्याचंही कंगना म्हणाली. 

'इमर्जन्सी' चित्रपटात झळकली कंगना
कंगनाचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. आता नवीन मालकाच्या आगमनानंतर, कंगना पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परत येईल अशी अपेक्षा आहे. पण याबाबत बोलताना कंगानं सूचक विधान केलं. "मी एक वर्ष ट्विटरवर होते पण ट्विटर मला एक वर्षही सहन करू शकलं नाही", असं कंगना म्हणाली. कंगना 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनुपम खैर, सतीश कौशिक, श्रेयस तळपदे आणि मिलिंद सोमण यांच्याही भूमिका आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: himachal pradesh assembly election kangana ranaut says she is willing to fight elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.