Hillarious : बॉलिवूड सेलिब्रिटींचे फनी टविट्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 19:26 IST2017-08-23T13:56:51+5:302017-08-23T19:26:51+5:30
अबोली कुलकर्णी अभिनेत्री टविंकल खन्ना हिने अलीकडेच तिच्या टविटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात एक व्यक्ती समुद्रकिनारी ...
.jpg)
Hillarious : बॉलिवूड सेलिब्रिटींचे फनी टविट्स !
अभिनेत्री टविंकल खन्ना हिने अलीकडेच तिच्या टविटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात एक व्यक्ती समुद्रकिनारी शौचास बसलेला दिसतो आहे. या टिवटमधून तिला हे सांगायचे आहे की, ‘चित्रपटांच्या माध्यमातून कितीही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नसतो, हेच खरं.’ तिचा हा फोटो खुप ट्रोल झाला. फॅन्सनी या टविटला फनी टविट समजून तिची टर उडवली. असे अनेक फनी टविट्स सेलिब्रिटी करत असतात. पाहूयात, अशाच काही गमतीशीर टविटसचा नजराणा खास तुमच्यासाठी...
* केआरके
नेहमी चर्चेत आणि वादात असणारा सेलिब्रिटी म्हणजे केआरके. टविटरवर तो नेहमीच वेगवेगळया कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने केलेले एक फनी टिवट पाहा : ‘ मी आज बरेच टविट केले आहेत. पण, माझ्या प्रत्येक टविटचा अर्थ लावत बसू नका. मी कधीकधी माझ्या मनाच्या विरूद्ध जाऊनही टविट करत असतो.
* प्रियांका चोप्रा
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ही आता ग्लोबल पर्सनॅलिटी झाली आहे. एकदा एखादी व्यक्ती जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली की, तिच्याकडून होणाऱ्या चुका अपेक्षित असत नाहीत. पण, पाहा ना, पीसीने किती क्षुल्लक चुक केली आहे. पण त्यामुळे ती ट्रोल देखील झाली. तिने पोस्टमध्ये ‘लिटील’ लिहायचे तर ‘इल’ म्हणजेच आजारी असे लिहिले आहे. ती म्हणते,‘ कधीकधी आपण सोशल मीडियावर पोस्ट करण्याअगोदर ‘आजारी’ बसणे गरजेचे असते,’ असे ती म्हणते. वास्तविक तिला थोडेसे म्हणायचे होते.
* दीपिका पादुकोण
‘बॉलिवूडची मस्तानी गर्ल’ दीपिका पादुकोण हिला खरंच व्याकरणाचे धडे गिरवण्याची गरज आहे, असे तिने केलेल्या या पोस्टवरून वाटते. तिने प्रियांका चोप्राला एक टिवट केले की,‘हॅप्पी बर्थडे लव्हलीएस्ट! लव्ह अॅण्ड हॅप्पीनेस.. तूझ्यामागे पार्टी बाकी आहे.’ वास्तविक तिला असे लिहायचे होते की, तू परतल्यावर मला पार्टी दे. तुझी पार्टी बाकी आहे.
* सलमान खान
‘बॉलिवूडचा दबंग स्टार’ सलमान खान याने आत्तापर्यंत एकापेक्षा एक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, त्यांची इंग्रजी भाषा काही फार प्रभावी वाटत नाही. या टविटमध्येच पाहा ना, त्याला नेमकं काय म्हणायचंय हेच कळत नाही. तो लिहितो की,‘मी प्रामाणिकपणे सांगतो की, प्रेम, काळजी, केयर, शेअर बाकी काही नाही, बसं एवढंच.’ आता यातून खरंतर काहीच कळत नाही. वाचल्यावर हसून हसून लोटपोट व्हायची वेळ येते.
* सनी लिओनी
पॉर्नस्टार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनीचे टिवट्सही काही कमी नाहीत. आता हेच पाहा ना, तिलाही इंग्रजीचे थोडेफार धडे मिळाले पाहिजेत, असेच यावरून वाटते आहे. ती लिहिते,‘अमेरिके त विमान चालवणं हे भारतात विमान चालवण्यापेक्षा फार कठीण आहे. आभारी आहे की, मी हॉस्टनला उतरले.’ या तिच्या टविटची फॅन्सनी खूप मजा उडवली होती.