n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">वांद्रे येथील कॉर्नर हाऊसमध्ये डिनर केल्यानंतर सोनाक्षी परतत असताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी तिला घेरले. सोनाक्षी नेहमीच फोटोग्राफर्सना पोझेस देते. हसतमुखाने फोटो काढून घेते. यामुळे तिचे आणि मीडियाचे नाते खूपच चांगले आहे. पण नुकतेच फोटोग्राफर्सना सोनाक्षीचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले. कॉर्नर हाऊसमधून बाहेर पडल्यावर सोनाक्षीने फोटोग्राफर्सना पाहताच गाडीत असलेली उशी तोंडावर घेऊन तोंड लपवले. सोनाक्षीने केलेला हा प्रकार पाहाता सगळ्यांनाच धक्का बसला. पण सोनाक्षी अशी का वागतेय याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. सोनाक्षीने तोंड का लपवले याचे उत्तर केवळ तीच देऊ शकते.