​हजरजवाबी शाहरूख!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 20:26 IST2016-04-17T14:56:05+5:302016-04-17T20:26:05+5:30

किंगखान शाहरूखच्या अभिनयाबद्दल मत-मतांतरे असू शकतात.  पण शाहरूख एक हजरजवाबी व्यक्ति आहे, यात मात्र शंका नाही. त्यामुळेच अनेक पत्रकार ...

Hi Shah Rukh !! | ​हजरजवाबी शाहरूख!!

​हजरजवाबी शाहरूख!!

ंगखान शाहरूखच्या अभिनयाबद्दल मत-मतांतरे असू शकतात.  पण शाहरूख एक हजरजवाबी व्यक्ति आहे, यात मात्र शंका नाही. त्यामुळेच अनेक पत्रकार शाहरूखला प्रश्न विचारताना दोन तीनदा विचार करतात. अलीकडे एका पत्रपरिषदेत शाहरूखच्या याच हजरजवाबीपणाचा प्रत्यय आला. ‘फॅन’ या चित्रपटाच्या रिलीजसंदर्भात ही पत्रपरिषद होती. अनेक पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांनी एका पाठोपाठ एक प्रश्न विचारणे सुरु केले आणि शाहरूखने ते टोलवत जोरदार फलंदाजी केली. याचदरम्यान एका महिला पत्रकाराने शाहरूखसमोर एक प्रामाणिक कबुली दिली.‘रब ने बना दी जोडी’ पाहिपर्यंत मी तुझी अजिबात चाहती नव्हती आणि मला तुझे कामही आवडत नव्हते, असे ती महिला पत्रकार शाहरूखला उद्देशून म्हणाली. यावर एक क्षणही न दवडता शाहरूखने काय उत्तर दिले माहितीयं, तो म्हणाला....
"It is okay darling. Good taste takes time to develop!"
 आहे ना, शाहरूख हजरजवाबी? काय मानले ना?

Web Title: Hi Shah Rukh !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.