रिअ‍ॅलिटी शोमध्ये नायिकांचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 05:09 IST2016-02-24T12:07:40+5:302016-02-24T05:09:29+5:30

अभिनेत्री रविना टंडन बॉलीवूडमधील मेन स्ट्रीमपासून बाजूला पडलेली असली तरी तिची क्रेझ अद्यापही कायम आहे. ‘शाईन इंडिया’ या डान्स ...

The heroine's flick in the reality show | रिअ‍ॅलिटी शोमध्ये नायिकांचा जलवा

रिअ‍ॅलिटी शोमध्ये नायिकांचा जलवा

ong>अभिनेत्री रविना टंडन बॉलीवूडमधील मेन स्ट्रीमपासून बाजूला पडलेली असली तरी तिची क्रेझ अद्यापही कायम आहे. ‘शाईन इंडिया’ या डान्स रियालिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तिला प्रत्येक भागासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये मिळणार आहेत.



टेलिव्हिजनवर काम करणाºया बॉलीवूडमधील अभिनेत्रींना मिळणारी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी रक्कम ठरली आहे. रविनापूर्वी माधुरी दीक्षित आणि शिल्पा शेट्टी यांनी टेलिव्हिजने शोमध्ये काम करताना प्रत्येक भागाकरिता १ कोटी रुपये आकारले होते.

एकेकाळी ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून बॉलीवूड गाजवणाºया रविनाने याआधी ‘साहिब बिबी गुलाम’, ‘छोटे मिया’, ‘कॉमेडी का महामुकाबला’ आणि सिंपली बाते विथ रविना’ या टेलिव्हिजन शोजमध्ये आपली छाप सोडली आहे. ‘शाईन इंडिया’ या शोमध्ये तिच्यासोबत अभिनेता गोविंदा आणि नृत्यदिग्दर्शिका सरोज खान हे दिग्गजदेखील परीक्षकांच्या भूमिकेत असतील. ‘चॅनेल व्ही’वर पुढील महिन्यात हा शो प्रसारित होणार आहे.



माधुरी दीक्षित 
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिने लग्नानंतर बॉलिवूडमध्ये ‘नच बलिये’ या चित्रपटातून पुनरागमन केले खरे मात्र तिची ही नवी इनिंग फार काळ चालू शकली नाही. अखेर तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. सेलिब्रेटी डान्स शो ‘झलक दिखला जा’ मध्ये रेमो डिसुजा सोबत ती या शोमधील सहभागी स्पर्धकांचे परर्फामन्स जज करताना दिसली. आता पुन्हा ती डान्स प्लस हा रियालिटी शो जज करणार आहे. 



सोनाली बेंद्रे
सोनाली बेंद्रे हिने लग्नानंतर रियालिटी टीव्ही शोमधून पुनरागमन केले. दरम्यान ती मराठी चित्रपटात आयटम साँग करीत होती. इंडिया गॉट टॅलेंट व इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमात ती जज म्हणून आपली भूमिका करीत होती. 



शिल्पा शेट्टी 
रियालिटी टीव्ही शो ‘बीग बॉस’मध्ये विजेती ठरल्यावर देशातील मोठ्या सेलिब्रेटीत  शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाऊ लागले. झलक दिखला जा, नच बलिये सिजन 5 व सिजन 6 मध्ये ती जजच्या भूमिकेत दिसली होती. 

Web Title: The heroine's flick in the reality show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.