पोलिसाच्या भूमिकेतील नायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 02:07 IST2016-02-14T09:07:05+5:302016-02-14T02:07:05+5:30

प्रकाश झा दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘जय गंगाजल’मध्ये प्रियंका चोप्रा हिने पोलीस तडफदार अधिकाºयाची ...

The heroine in the role of policemen | पोलिसाच्या भूमिकेतील नायिका

पोलिसाच्या भूमिकेतील नायिका

ong>प्रकाश झा दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘जय गंगाजल’मध्ये प्रियंका चोप्रा हिने पोलीस तडफदार अधिकाºयाची भूमिका केली आहे. पोलीस अधिकारी म्हणून तिचा हा तिसरा चित्रपट असेल. यापूर्वी प्रियंकाने ‘डॉन -2’ व ‘गुंडे’ या चित्रपटात पोलीस अधिकाºयाची भूमिका केली होती. इंडस्ट्रीमधील अन्य नायिकांशी तुलना केल्यास पोलीस अधिकारी या चरित्राची हॅट्रिक लगावणारी पहिली अभिनेत्री ठरेल.
 


पोलीस अधिकाºयाची भूमिका करणाºया यादीत डझनभराहून अधिक नायिकांचा समावेश होतो. यात हेमा मालिनी, रेखा यापासून ते थेट बिपाशा बसू व राणी मुखर्जी यांचे नाव घेता येईल. हेमा मालिनीने ‘अंधा कानून’ या चित्रपटात रजनीकांतची बहिण व पोलीस अधिकारी अशा दुहेरी भूमिके त दिसली. रजनीसोबतच रेखाने ‘फूल बने अंगारे’ या चित्रपटात पोलीस अधिकारी म्हणून भूमिका केली. हेमा व रेखा यांच्या भूमिका तडफदार होत्या. 



‘जख्मी औरत’ या चित्रपटात डिंपल कपाडिया हिने अशीच भूमिका साकारली. दाक्षिणात्य अभिनेत्री विजयाशांती हिने ‘तेजस्विनी’मध्ये साकारलेली तडफदार पोलीस अधिकाºयाची भूमिका चांगलीच गाजली. सुभाष घई यांच्या ‘खलनायक’मध्ये माधुरी दीक्षित पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसली. 



ग्लॅमरस सुष्मिता सेन हिने ‘समय’ या चित्रपटात आयपीएस अधिकाºयाची भूमिका केली. ‘धूम-2’मध्ये बिपाशा बसू, ‘मर्दानी’ या चित्रपटात राणी मुखर्जी यांनी तडफदार पोलीस इन्स्पेक्टरची भूमिक ा केल्या आहेत.

‘चक्रव्यूह’मध्ये ईशा गुप्ता, ‘देव डी’मध्ये हुमा कुरेशी यांच्या भूमिका पोलीस अधिकाºयाच्या होत्या. तब्बू दोन वेळा अशा भूमिकेत दिसली. ‘कोहराम’ व मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘दृष्शम’मध्ये पोलीस महानिरीक्षक (आयजी)ची भूमिका केली. या चित्रपटात तिच्या अभिनयाची प्रसंशा झाली. 

Web Title: The heroine in the role of policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.