खऱ्या आयुष्यातले 'बाबुराव' पाहिले का? 'या' व्यक्तीवरुन घेण्यात आलं 'हेरा फेरी'मधलं कॅरेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:10 IST2025-05-27T12:09:41+5:302025-05-27T12:10:06+5:30
ये बाबुराव का स्टाईल है! 'हेरा फेरी' मधलं बाबुराव आपटे कॅरेक्टर कोणापासून प्रेरित आहे माहितीये का?

खऱ्या आयुष्यातले 'बाबुराव' पाहिले का? 'या' व्यक्तीवरुन घेण्यात आलं 'हेरा फेरी'मधलं कॅरेक्टर
सध्या 'हेरा फेरी' सिनेमाचा वाद चर्चेत आहे. हेरा फेरीच्या तिसऱ्या भागातून बाबुराव म्हणजेच अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) बाहेर पडले आहेत. त्यांनी अचानक सिनेमा सोडल्याने चाहत्यांची निराशाच झाली आहे. परेश रावल यांना 'बाबुराव आपटे' या भूमिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली. बाबुराव या भूमिकेत त्यांच्याशिवाय इतर कोणाचीच कल्पना होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहितीये का बाबुरावची स्टाईल ही खऱ्या आयुष्यातील एका व्यक्तीवरुन प्रेरित आहे. कोण आहे ती व्यक्ती?
ये बाबुराव का स्टाईल है! 'हेरा फेरी' मधलं बाबुराव आपटे कॅरेक्टर आणि त्यांची युनिक स्टाईल लोकप्रिय झाली. पण खऱ्या आयुष्यात असेच एक बाबुराव आहेत ज्यांची बोलण्याची आणि दिसण्याची स्टाईल तशीच आहे. त्यांच्यावरुनच हे कॅरेक्टर घेण्यात आलं आहे. परेश रावल यांची बाबुराव आपटे ही भूमिका गुजराती थिएटरमधील प्रसिद्ध संगीतकार रजत ढोलकिया (Rajat Dholakia) यांच्यावरुन प्रेरित होती. त्यांना सगळे प्रेमाने 'जुकू' म्हणतात. प्रसिद्ध अभिनेता स्नेहल डाबी यांनीच हा खुलासा केला होता. पांढरी बनियन, जाड भिंगाचा चष्मा अशाच अवतारात रजत ढोलकिया दिसतात. एवढंच काय तर त्यांची बोलण्याची स्टाईलही अगदी तशीच आहे. जेव्हा रजत ढोलकियांना हे कळलं की आपल्यावरुनच हे बाबुराव कॅरेक्टर घेण्यात आलं आहे तेव्हा तेही खूप हसले.
रजत ढोलकिया यांनी 'धारावी', 'होली', 'मिर्च मसाला', ' 1942 अ लव्ह स्टोरी' सारख्या सिनेमांमध्ये संगीत दिग्दर्शन केलं आहे. गंमत म्हणजे परेश रावल यांनी डॉमिनॉज पिझ्झाची 'पिझ्झा आये फ्री' जाहिरात केली. या जाहिरातीचं जिंगल रजत ढोलकिया यांनीच कंपोज केलं होतं.
हेरा फेरीचा दुसरा पार्ट फिर हेरा फेरीही खूप गाजला. आता याचा तिसरा पार्टही येणार आहे. पण परेश रावल यांनी मात्र सिनेमा करणार नाही असं सांगितल्याने चाहत्यांची निराशाच झाली आहे.