​ ‘बीयॉन्ड द ड्रीम गर्ल’ मधून उलगडणार हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 11:02 IST2017-10-15T05:32:15+5:302017-10-15T11:02:15+5:30

ऋषी कपूर, करण जोहर, रेखा अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य आपण पुस्तक रूपात वाचले. आता या यादीत ड्रिम गर्ल ...

Hema Malini's many secrets in life, from 'Beyond the Dream Girl' | ​ ‘बीयॉन्ड द ड्रीम गर्ल’ मधून उलगडणार हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये !

​ ‘बीयॉन्ड द ड्रीम गर्ल’ मधून उलगडणार हेमा मालिनी यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये !

ी कपूर, करण जोहर, रेखा अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य आपण पुस्तक रूपात वाचले. आता या यादीत ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांचे नावही सामील झाले आहे. उद्या (१६ आॅक्टोबर) हेमा मालिनी यांच्या ६९ व्या जन्मदिनी ‘बीयॉन्ड द ड्रीम गर्ल’ या त्यांच्या जीवनचरित्राचे अर्थात बायोग्राफीचे  प्रकाशन होत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. या बायोग्राफीमध्ये हेमांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी उलगडणार आहेत. अर्थात यात हेमांच्या आयुष्याचा काही भाग जाणीवपूर्वक वगळण्यात आला आहे. धर्मेन्द्र यांच्या दुसºया पत्नी प्रकाश कौर आणि मुले सनी देओल व बॉबी देओल या सर्वांचा उल्लेख या बायोग्राफीत कुठेच सापडणार नाही.



‘स्टारडस्ट’चे माजी संपादक आणि निर्माता राम कमल मुखर्जी यांनी हेमा मालिनींचे हे जीवनचरित्र लिहिले आहे. याबद्दल त्यांनी सांगितले की, या पुस्तकातून हेमा मालिनींच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पहिल्यांदा जगासमोर येणार आहे. त्यांचे करिअर, लग्न अशा सगळ्यांच गोष्टींचा उल्लेख यात आहे. यात सनी-बॉबी आणि त्यांची आई प्रकाश कौर यांच्याबद्दलही काही वाचायला मिळणार का? असे विचारले असता मुखर्जी यांनी नकारार्थी उत्तर दिले. पुस्तक हेमांच्या आयुष्यावर असल्याने त्यात या गोष्टी नाहीत, असे त्यांनी सांगितले.
 हेमा मालिनी या धर्मेन्द्र यांच्या दुसºया पत्नी. धर्मेन्द्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे.  

ALSO READ: धर्मेंद्र, हेमामालिनी यांना चादर गुंडाळलेल्या अवस्थेत पकडले तेव्हा...

हेमा यांच्या जीवनचरित्रात हेमांचा अभिनय प्रवास सविस्तर वाचायला मिळणार आहे. त्या अभिनयात कशा आल्यात, राजकारणात कशा आल्यात, हे यात वाचायला मिळणार आहे. हेमा मालिनी व जयललिता  एका तामिळ सिनेमातून डेब्यू करू इच्छित होत्या. पण असे झाले नाही. यानंतर १६ व्या वर्षी राजकपूर यांच्या अपोझिट ‘सपनों का सौदागर’ मधून हेमा मालिनी बॉलिवूडमध्ये आल्यात. हेमा मालिनीवर त्यांची आई जया लक्ष्मी चक्रवर्ती यांचा मोठा प्रभाव होता. प्रोड्यूसर हेमा यांना साईन करण्यासाठी त्यांच्या आईशी चर्चा करत. जितेन्द्रसोबत हेमा यांचे अफेअर नव्हते. पण दोघांचेही लग्न होणार होते. पण ते तुटले, अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी   या बायोग्राफीत वाचायला मिळणार आहेत.

Web Title: Hema Malini's many secrets in life, from 'Beyond the Dream Girl'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.