५८ व्या वर्षी बाळाला जन्म दिल्याबद्दल सिद्धू मुसेवालाच्या आईला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 04:30 PM2024-03-20T16:30:52+5:302024-03-20T16:33:16+5:30

सिद्धू मुसेवालाच्या आईला आरोग्य मंत्रालयाने दिली नोटीस, काय घडलंंय नेमकं वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

health ministry notice to mother of Sidhu Moosewala who became a mother at the age of 58 using IVF | ५८ व्या वर्षी बाळाला जन्म दिल्याबद्दल सिद्धू मुसेवालाच्या आईला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

५८ व्या वर्षी बाळाला जन्म दिल्याबद्दल सिद्धू मुसेवालाच्या आईला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करुन १७ मार्चला मुलाला जन्म दिला. पण आता सिद्धू मुसेवालाची आई आणि त्यांचं कुटुंब अडचणीत सापडलं आहे. सिद्धू मुसेवालाच्या आईला आरोग्य मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकार आणि सुद्धे मुसेवालाच्या आईकडून मुलाच्या जन्मासंबंधी जाब विचारला आहे. वाचा संपूर्ण प्रकरण.

आरोग्य मंत्रालयाने सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर आणि पंजाब सरकारला दिलेल्या नोटीशीत म्हटलंय की, "सहाय्यक प्रजनन प्रौद्योगिकी (विनियमन) अधिनियम २०२१ धारा अनुसार ART सेवांच्या आधारी आई होणाऱ्या प्रत्येक महिलेची वयोमर्यादा २१ ते ५० निश्चित केली गेलीय. त्यामुळे चरण कौर यांच्या आई होण्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. यासंबंधित कारवाईची कॉपी लवकरच दिली जाईल." 

सिद्धू मुसेवालाचे वडिल बलकौर सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर करत काही दिवसांपुर्वी पंजाब सरकारवर आरोप केले आहेत. मुलाच्या जन्मानंतर पंजाब सरकार सातत्याने त्यांना त्रास देत आहे. अवैध मार्गाने मुल जन्माला घालण्याबद्दल पुरावा मागितला जात आहे. आम्ही सध्या बाळाची काळजी घेण्यास सतर्क आहोत, असं म्हणत सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी पंजाब सरकारवर आरोप केले आहेत. आता आरोग्य मंत्रालय सिद्धू मुसेवालाची आई आणि त्यांच्या कुटुंबावर कशी कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Web Title: health ministry notice to mother of Sidhu Moosewala who became a mother at the age of 58 using IVF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.