​‘ऐ दिल है मुश्किल’मधील फवादचा deleted सीन तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 14:18 IST2016-12-15T14:18:23+5:302016-12-15T14:18:23+5:30

Fawad Khan’s scenes from Ae Dil Hai Mushkil were brutally chopped : Fawad Khan: करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहांत जाऊन बघितला असेलच. पण पडद्यावर तुम्ही न पाहिलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा एक सीनआम्ही इथे तुम्हाला दाखवणार आहोत.

Have you watched the scene of 'Aye Dil Hai Tangh'? | ​‘ऐ दिल है मुश्किल’मधील फवादचा deleted सीन तुम्ही पाहिलात का?

​‘ऐ दिल है मुश्किल’मधील फवादचा deleted सीन तुम्ही पाहिलात का?

ण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा तुम्ही चित्रपटगृहांत जाऊन बघितला असेलच. पण पडद्यावर तुम्ही न पाहिलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा एक सीनआम्ही इथे तुम्हाला दाखवणार आहोत. होय, पाकिस्तानी कलावंतांना बॉलिवूडमध्ये बंदी करण्याच्या मागणीनंतर ‘ऐ दिल है मुश्किल’मधील फवादच्या सीन्सला कात्री लावण्यात आली. इतका की, फवाद उणापुरा काही मिनिटांसाठीच  चित्रपटात झळकला. खरे तर चित्रपटात फवाद खान पाकिस्तानातील कराचीमधून येतो, असे दाखवण्यात येणार होते. पण चित्रपट वादात सापडल्यानंतर यात बदल करून फवाद लखनौमधून येतो, असे दाखवण्यात आले. फवादच्या सीन्सला अशी कात्री लागलेली पाहून त्याच्या चाहत्यांची बरीच निराशा झाली. हीच निराशा दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चित्रपटात नसलेला फवादच्या एका सीन्सचे फुटेज आम्ही सोबत देत आहोत. यात फवाद आणि अनुष्का शर्मा यांची केमिस्ट्री दिसतेयं. या सीनमध्ये अनुष्का व फवाद दोघेही रणबीर कपूर आणि त्याच्या गर्लफ्रेन्डबद्दल बोलत आहेत. याचवेळी ‘आय यू जेलस’ असे फवाद अनुष्काला विचारतो. यावर अनुष्का काय उत्तर देते, हे जाणून घ्यायला मात्र तुम्हाला हा व्हिडिओच पाहावा लागेल.



  उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकाराला बॉलिवूडच्या चित्रपटात झळकू देणार नाही असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. फवाद खानची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला‘ऐ दिल है मुश्किल’ यामुळे वादात सापडला होता. फवादला काढा अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही,असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले होते. मनसेच्या या ताठर भूमिकेमुळे चित्रपटाचा निमार्ता करण जोहरने राजनाथ सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात मध्यस्थी केली होती.
 

Web Title: Have you watched the scene of 'Aye Dil Hai Tangh'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.