'मुन्नाभाई MBBS'मधील 'सर्किट'च्या लेकीला पाहिलंत का?, ती सौंदर्यात आघाडीच्या नायिकांना देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:40 IST2025-09-25T15:39:56+5:302025-09-25T15:40:25+5:30
Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी, ज्याने 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमात 'सर्किट'च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तो सध्या अक्षय कुमारसोबत 'जॉली एलएलबी ३' या कोर्टरूम कॉमेडी ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे.

'मुन्नाभाई MBBS'मधील 'सर्किट'च्या लेकीला पाहिलंत का?, ती सौंदर्यात आघाडीच्या नायिकांना देते टक्कर
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) ज्याने 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai MBBS Movie) सिनेमात 'सर्किट'च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तो सध्या अक्षय कुमारसोबत 'जॉली एलएलबी ३' या कोर्टरूम कॉमेडी ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयोजित केलेल्या खास स्क्रीनिंगला चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. या वेळी अर्शद वारसी त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि लाडकी लेक जेने जो वारसीसोबत आला होता. 'जॉली एलएलबी ३' च्या स्क्रीनिंगवर उपस्थित असलेल्या पापाराझींचे कॅमेरे अर्शदच्या लेकीवरच खिळले होते. खरेतर, बॉलिवूडच्या 'सर्किट'ची मुलगी जेने सौंदर्यामध्ये कोणत्याही आघाडीच्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
अर्शद वारसीने १९९९ मध्ये मारिया गोरेटीशी लग्न केलं. त्यांना जेके वारसी (वय २१) नावाचा मुलगा आणि जेने जो वारसी (वय १८) नावाची मुलगी आहे. आता त्यांची दोन्ही मुले चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहेत. अर्शदची लेक जेने जितकी सुंदर आहे, तितकाच त्याचा मुलगा जेकेही अगदी त्याच्या वडिलांसारखाच हॅण्डसम दिसतो. अर्शदची मुलगी जेने जो हिचा जन्म २ मे २००७ रोजी झाला आणि ती आता १८ वर्षांची झाली आहे. जेने सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला सध्या १० हजारांहून अधिक लोक फॉलो करतात, ज्यात तिचे वडील अर्शदही आहेत. जेनेने तिच्या इंस्टाग्रामवर आतापर्यंत ६ पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यात तिचे फिरण्याचे आणि प्रवासाचे फोटो जास्त आहेत.
जेनेच्या फोटो पाहून तिच्या डेब्यूची चाहत्यांमध्ये उत्सुकता
या वर्षी जेनेने तिचा १८ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने तिच्या लहानपणापासून १८ वर्षांपर्यंतचे अनेक सुंदर फोटो शेअर केले होते, ज्यात तिचे लहानपणीचे गोड फोटो पाहायला मिळतात. तिने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. याशिवाय, तिने तिच्या स्कुबा डायव्हिंग ॲडव्हेंचरचे व्हिडीओही शेअर केले आहेत.
जेनेच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत आणि 'ती बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार?' असा प्रश्न विचारत आहेत.