तुम्ही पाहिलाय का? शाहरूख खान-माहिरा खानचा ‘उडी उडी जाये’ गाण्यातील अंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 13:14 IST2017-01-10T13:06:26+5:302017-01-10T13:14:22+5:30

शाहरूख खान आणि माहिरा खान यांच्या मुख्य भूमिकेतील ‘रईस’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूख खान मकरसंक्रांतीला पतंग ...

Have you seen? Shahrukh Khan-Mahira Khan's 'Loody Hopes' Singing Guess ... | तुम्ही पाहिलाय का? शाहरूख खान-माहिरा खानचा ‘उडी उडी जाये’ गाण्यातील अंदाज...

तुम्ही पाहिलाय का? शाहरूख खान-माहिरा खानचा ‘उडी उडी जाये’ गाण्यातील अंदाज...

हरूख खान आणि माहिरा खान यांच्या मुख्य भूमिकेतील ‘रईस’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूख खान मकरसंक्रांतीला पतंग देखील उडवणार असल्याचे अलीकडेच कळालेय. चित्रपटातील ‘ओ जालीमा’ हे गाणे रिलीज झाले अन् शाहरूख-माहिराच्या रोमँटिक केमिस्ट्रीने चाहते त्यांच्यावर फिदा झाले. चित्रपटातील दुसरे गाणे केव्हा लाँच होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच निर्माते रितेश सिंधवानी यांनी ‘उडी उडी जाये’ गाण्याचा फर्स्ट लुक टिवटरवर लाँच केलाय. खरंतर हे एक गरबा नृत्यावर आधारित गाणे आहे. लाल रंगाच्या साडीतील माहिरा आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यातील शाहरूख यांची जोडी एकमेकांसोबत खुलून दिसते आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}


‘उडी उडी’ गाण्याचे विशेष आणि महत्त्व सांगताना दिग्दर्शक राहुल ढोलकिया म्हणाले,‘गुजरातमध्ये ‘उत्तरायण’ हा एक खुप मोठा सण असतो. गरबा नृत्य हा आमच्या राज्याचा सर्वांत लोकप्रिय डान्सप्रकार मानला जातो. गुजरातमध्ये जर एखाद्या चित्रपटाची शूटिंग सुरू असेल तर ती गरबा नृत्याच्या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. हे गाणे आम्ही १४ जानेवारीला रिलीज करणार आहोत. तसेच शाहरूखच्या चित्रपटातील व्यक्तीरेखेला पतंग उडवायला प्रचंड आवडत असतं म्हणून चित्रपटाच्या टीमने खास सुरतवरून पतंगाचा ‘मांजा’(दोरा) मागवण्यात आला आहे. याविषयी शाहरूखचा एक डायलॉग यात आहे,‘अगर काटने का डर होता ना, तो पतंग नही चढाता, फिरकी पकडता.’ 

                               

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित ‘रईस’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपट मागील वर्षी २५ जानेवारीला ईदच्या मुहूर्तावर सलमान खानच्या ‘सुल्तान’सोबत रिलीज होणार होता. मात्र, बॉक्स आॅफिस टाळण्यासाठी निर्मात्यांनी जानेवारीत चित्रपट रिलीज करायचे ठरवले. आता हृतिक रोशनचा होम प्रोडक्शन असलेल्या ‘काबील’ चित्रपटासोबत रिलीज होणार आहे. पाहूयात, बॉक्स आॅफिसवर ‘रईस’ आणि ‘काबील’ हा संघर्ष कसा होतो ते!

Web Title: Have you seen? Shahrukh Khan-Mahira Khan's 'Loody Hopes' Singing Guess ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.