रवीना टंडनच्या लेकाला पाहिलंत का? बॉलिवूडचे सगळे स्टारकिड त्याच्यापुढे फिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:46 IST2025-09-22T17:44:58+5:302025-09-22T17:46:00+5:30

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिला दोन मुले आहेत. तिची मुलगी राशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर तिचा मुलगा रणबीरवर्धन थडानी (Ranbirvardhan Thadani) देखील सतत चर्चेत असतो.

Have you seen Raveena Tandon's Son Ranbirvardhan Thadani? All the star kids of Bollywood pale in comparison to her. | रवीना टंडनच्या लेकाला पाहिलंत का? बॉलिवूडचे सगळे स्टारकिड त्याच्यापुढे फिके

रवीना टंडनच्या लेकाला पाहिलंत का? बॉलिवूडचे सगळे स्टारकिड त्याच्यापुढे फिके

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिला दोन मुले आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. तिची मुलगी राशा(Rasha Thadani)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर तिचा मुलगा रणबीरवर्धन थडानी (Ranbirvardhan Thadani) देखील सतत चर्चेत असतो. रवीना तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतानाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.

रणबीरवर्धन अनेकदा त्याची आई रवीना आणि बहीण राशा थडानीसोबत दिसतो. नुकताच तो राशाच्या 'आजाद' (Azad) या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये आईसोबत दिसला होता. त्यावेळी त्याने खूप लक्ष वेधून घेतले होते. तो फक्त १८ वर्षांचा असूनही, त्याचे व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी आहे. 


एका मुलाखतीत रवीनाने सांगितले होते की, तिचा मुलगा अभिनेता बनू इच्छित नाही. त्याचे स्वप्न वकील बनण्याचे आहे. रणबीरवर्धन अनेकदा त्याच्या आईसोबत कार्यक्रमांमध्ये दिसतो आणि सेलिब्रिटींसोबत फोटो काढतो. तो त्याची बहीण राशासोबत खूप चांगले बॉण्डिंग शेअर करतो, जे त्यांच्या अनेक फोटोंमधून दिसून येते.

राशा थडानी वर्कफ्रंट
राशा थडानीने 'आजाद' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अजय देवगणचा भाचा अमन देवगण देखील आहे. या चित्रपटातील राशाच्या कामाचे खूप कौतुक झाले.

Web Title: Have you seen Raveena Tandon's Son Ranbirvardhan Thadani? All the star kids of Bollywood pale in comparison to her.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.