नाग-नागिनवरील बॉलिवुडमधील हे चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 14:43 IST2017-07-27T09:13:35+5:302017-07-27T14:43:35+5:30

नाग-नागिनवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनवले गेले असून हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत.

Have you seen this movie of Bollywood on Naga-Nagin? | नाग-नागिनवरील बॉलिवुडमधील हे चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का?

नाग-नागिनवरील बॉलिवुडमधील हे चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का?

ग-नागिन आणि बॉलिवूडचे खूप जवळचे नाते आहे. त्यांच्यावर आधारित अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवण्यात आले आहेत. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील झाले आहेत. भारतात नागपंचमीच्या निमित्ताने नागांची पूजा केली जाते. याच नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबाबत... 

शेषनाग
जितेंद्र, ऋषी कपूर, रेखा, डॅनी डँझोपा यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेषनाग या चित्रपटात आपल्याला एका छोट्याशा गावातील कथा पाहायला मिळाली होती. या गावात एक अघोरी बाबा असतो. या अघोरी बाबासोबतचा नागांचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता. 

नगिना
नगिना या चित्रपटात ऋषी कपूर, श्रीदेवी प्रमुख भूमिकेत होते. श्रीदेवी या चित्रपटात नागिन दाखवली असून ऋषी कपूर हा सामान्य व्यक्ती आहे. या चित्रपटातील खलनायक हा अमरिश पुरी असून त्याला श्रीदेवीकडे असणारा नागमणी हवा असतो.




नागिन
रिना रॉय, सुनील दत्त, फिरोज खान, संजय खान, रंजीत, रेखा, मुमताज, योगिता बाली, कबीर बेदी, विनोद मेहरा आणि जितेंद्र अशी नागिन या चित्रपटाची भली मोठी स्टार कास्ट होती. रिना रॉय ही या चित्रपटात नागिन असून जितेंद्र हा नाग असतो. पण जितेंद्रचा खून सुनील दत्त आणि त्याचे सगळे मित्र मिळून करतात. त्यामुळे रिना रॉय बदला घेण्यासाठी यातील अनेकांचा खून करते.



विषकन्या
कुणाल गोस्वामी आणि पूजा बेदीच्या विषकन्या या चित्रपटात एका फॉरेस्ट ऑफिसर आणि त्याच्या पत्नीचा खून होतो आणि त्यांच्या मुलीचा सांभाळ गावकरी करतात. पण ही मुलगी नागाचे विष पिते आणि विषकन्या बनते आणि आपल्या आई-वडिलांच्या खुनाचा बदला घेते. 



हिस्स
मल्लिका शेरावतच्या हिस्स या चित्रपटातील मल्लिकाचा लूक खूपच भयानक होता. या चित्रपटात एका वैज्ञानिकाला कॅन्सर झालेला असतो. कॅन्सर बरा होण्यासाठी तो नागमणी चोरण्याचा विचार करतो पण नागिन त्याचा पाठलाग करते आणि त्याला मारून टाकते. 

Web Title: Have you seen this movie of Bollywood on Naga-Nagin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.