बॅडमिंटन स्टार सायना नेहवालसोबत 'हसीना' श्रद्धा कपूरने सुरु केले काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:08 IST2017-09-08T11:35:01+5:302017-09-08T17:08:25+5:30

काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले होते की श्रद्धा कपूर सध्या बॅडमिंटनचे धडे गिरवते आहे. सायन नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी ...

'Haseena' Shraddha Kapoor started with badminton star Saina Nehwal | बॅडमिंटन स्टार सायना नेहवालसोबत 'हसीना' श्रद्धा कपूरने सुरु केले काम!

बॅडमिंटन स्टार सायना नेहवालसोबत 'हसीना' श्रद्धा कपूरने सुरु केले काम!

ही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले होते की श्रद्धा कपूर सध्या बॅडमिंटनचे धडे गिरवते आहे. सायन नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी ती ट्रेनिंग घेते आहे. श्रद्धाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बॅडमिंटन पटू सायना नेहवालसोबत दिसतेय. श्रद्धा सायनाकडून तिचे बारकावे समजण्याचा प्रयत्न करते आहे. सायना श्रद्धासोबत काही तरी महत्त्वाची चर्चा करताना दिसते आहे. श्रद्धाला सायनाकडून बॅडमिंटनच्या टेक्निक्स शिकताना दिसते आहे ज्याचा उपयोग तिला शूटिंग दरम्यान होईल. श्रद्धा हे प्रॉक्टिक्स सेशन एन्जॉय करताना दिसते आहे.        



ALSO RAED : ‘बाहुबली’ प्रभाससोबत नाव जुळताच श्रद्धा कपूरचे वाढले भाव!

ऐवढेच नाही तर श्रद्धा दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्याकडून ही धडे घेते आहे. मुंबई मिररमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार मुंबईत तिने त्यांच्याकडून ट्रेनिंग घेणे सुरू केले आहे. अजून चित्रपटाची शूटिंग पूर्ण झालेली नाही. सध्या श्रद्धा फक्त आपल्या बॅडमिंटनच्या ट्रेनिंग लक्ष केंद्रित करते आहे. श्रद्धासाठी हा चित्रपट महत्त्वाचा असल्याचा तिने सांगितले आहे. श्रद्धाचे म्हणणे आहे की हा सायनाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणे हे माझ्यासाठी आव्हानत्मक आहे. सायना या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसते आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहे. चित्रपटाची शूटिंग मुंबई आणइ हैदराबादमध्ये होणार आहे. हा चित्रपट 2018मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.  

याचित्रपटानंतर श्रद्धा आपला आगामी चित्रपट साहोच्या तयारीला लागणार आहे. याचित्रपटासाठी देखील तिला एक महिना ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. यात तिची जोडी प्रभाससोबत जमणार आहे. याचित्रपटासाठी श्रद्धाला 7 कोटींचे मानधन देण्यात आले आहे.  

Web Title: 'Haseena' Shraddha Kapoor started with badminton star Saina Nehwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.