विद्याकडून खूप काही शिकायला मिळाले - सैनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 16:57 IST2016-07-31T11:27:20+5:302016-07-31T16:57:20+5:30
‘बेगम जान’ या चित्रपटात विद्या बालन सोबत काम केल्याने, तिच्यापासून खूप काही शिकायला मिळाल्याचे अभिनेत्री फ्लोरा सैनीने म्हटले आहे. ...

विद्याकडून खूप काही शिकायला मिळाले - सैनी
आमची एका महिन्याची कार्यशाळा झाली. त्यामध्ये विद्याही सहभागी झालेली होती. सुरुवातील मला तिचा दबाव वाटत होता. परंतु, सेटवर तसेच काहीच नव्हते. विद्या सोबत काम करणे हा शिकण्यासाठी खूप महत्वाचा अनुभव राहिला. बेगम जान हा एक साधारण चित्रपट आहे. शुटींगचे काही असे दिवस होते की, विद्या ही शुटींगच्या नंतर येत होती व आमच्या गळ्यात पडत होती. काहीवेळेला ती रडत सुद्धा होती व मला खूप वाईट वाटते असे म्हणायची. आमची विचारपूस केल्याशिवाय ती रात्रीला झोपत सुद्धा नव्हती, असेही सैनी म्हणाली. साऊथमधील अनेक चित्रपटातही सैनीने काम केलेले आहे.