‘सुपर 30’साठी हृतिक रोशन बनला एटिडर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 11:00 IST2018-10-12T10:59:08+5:302018-10-12T11:00:17+5:30
ताजी बातमी खरी मानाल तर, विकास बहलमुळे ‘सुपर 30’चा खोळंबा होऊ नये यासाठी हृतिकने कंबर कसली आहे.

‘सुपर 30’साठी हृतिक रोशन बनला एटिडर?
हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ सध्या संकटात सापडला आहे. होय, या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याच्यावर ‘मीटू’ मोहिमेअंर्तगत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर ‘सुपर 30’ची रिलीज डेट लांबण्याची चिन्हे आहेत. विकास बहलवरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर हृतिकने विकाससोबत काम न करण्याचे संकेत दिले होते. असे झालेच तर ‘सुपर 30’चे प्रदर्शन लांबणे अटळ आहे. या चित्रपटाच्या रिलीजसाठी २५ जानेवारीचा मुहूर्त ठेवण्यात आला आहे. पण विकास बहलमुळे हा मुहूर्त टळण्याचीच शक्यता अधिक असताना हा मुहूर्त टळू नये, असा हृतिक रोशनचा प्रयत्न आहे. ताजी बातमी खरी मानाल तर, विकास बहलमुळे चित्रपटाचा खोळंबा होऊ नये यासाठी हृतिकने कंबर कसली आहे. यासाठी पोस्ट प्रॉडक्शनचे अर्थात एडिटींगचे काम त्याने आपल्या शिरावर घेतल्याचे कळतेय. पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाचा हृतिकला अनुश्रव आहे.वडिल राकेश रोशन यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्याने काम केले आहे. हा अनुभव ‘सुपर 30’साठी सध्या कामी येतो आहे.
तूर्तास हृतिक रोशन एडिटींग रूममध्ये तासन तास बसलेला दिसतो आहे. एडिटींग रूममध्ये मोबाईल फोन वापरास त्याने मनाई केल्याचीही खबर आहे.
‘सुपर 30’ हा हृतिकसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी लूक बदलण्यापासून तर अशी बरीच मेहनत त्याने घेतली आहे.