​ हरियाणा आणि बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 01:46 IST2016-03-08T08:44:22+5:302016-03-08T01:46:26+5:30

हरियाणामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या हिंसक घटना घटना घडत आहेत. त्यामुळे अभिनेता रणदीप हुड्डा दु:खी झाला आहे. हुड्डा रोहतक येथील ...

Haryana and Bollywood | ​ हरियाणा आणि बॉलिवूड

​ हरियाणा आणि बॉलिवूड

ियाणामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या हिंसक घटना घटना घडत आहेत. त्यामुळे अभिनेता रणदीप हुड्डा दु:खी झाला आहे. हुड्डा रोहतक येथील रहिवासी असून, या संपूर्ण जिल्ह्यात हिंसा उफाळली होती. हुड्डा या घटनेला आपल्या जीवनातील काळा दिवस मानतो. या घटनेमुळे बसलेल्या धक्क्यातून बाहेर पडण्यास वेळ लागणार असून मी लवकरच  रोहतक येथे जाईल, असे संकेत हुड्डाने दिले आहेत. हरिणायामधील लोक शांत असून, तेथून आलेल्या कलाकारांनी हिंदी चित्रपटात मोठे नाव कमावल्याकडेही रणदीपने लक्ष वेधले. रणदीपची ही गोष्ट खरी आहे. हरियाणा आणि बॉलिवूड यांच्यातील संबंध निकटचे आहेत. या राज्याने बॉलिवूडला उत्कृष्ट कलावंत दिले आहेत. त्यांचवर एक नजर...

सुनील दत्तपासून रणबीर हुड्डापर्यंत अनेकांनी हरियाणाहून येत मुंबईत नाव कमावले. सुनील दत्त यांचा जन्म कुरुक्षेत्र जिल्ह्यातील यमुनानगरमधील मंडोली गावात झाला होता. रोहतकचे नाव चमकविण्यात रणदीप हुड्डासमवेत मल्लिका शेरावत हिचाही वाटा आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी मल्लिकाचे शिक्षण रोहतक येथेच झाले होते.

अंबाला जिल्हा देखील मागे नाही. या जिल्ह्यातून ओम पुरी, जुही चावला आणि परिणिती चोप्रा आल्या आहेत. जुही चावलाचा जन्म अंबालामध्ये झाला होता. परिणीती अंबालामध्ये वाढली. दिल्लीला नाट्यक्षेत्रात जाण्यापूर्वी ती अंबाला येथेच रहात होती. त्याच ठिकाणी तिचा जन्म झाला.

अलीगढ चित्रपटात पत्रकार बनलेला राजकुमार राव (ज्याचे आडनाव पूर्वी यादव होते) याचा जन्म गुडगाव येथे झाला होता. रोहतकमधील खरखरा गावातून आलेल्या जयदीप अलहावतने रामगोपाल वर्मापासून रोहित शेट्टीपर्यंतच्या चित्रपटात काम केले आहे. अब तक ५६ आणि गंगाजलसह अनेक चित्रपटात काम केलेले यशपाल शर्मा हे हरियाणाच्या हिंस्सार येथील आहेत. टेलिव्हिजन अभिनेता यश टोंक हिस्सार येथील आहेत. टेलिव्हिजन कलाकार सृष्टी राणा फरीदाबादमध्ये जन्मली.

Web Title: Haryana and Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.